SL vs IND: टी 20 मालिकेसाठी या खेळाडूचं 2 वर्षांनी कमबॅक, कोण आहे तो?

Sri Lanka vs India T20i: श्रीलंका क्रिकेट बोर्डाने टीम इंडिया विरूद्धच्या टी 20 सीरिजसाठी संघाची घोषणा केली आहे. या मालिकेतून संघात 2 वर्षांनी कमबॅक झालं आहे.

SL vs IND: टी 20 मालिकेसाठी या खेळाडूचं 2 वर्षांनी कमबॅक, कोण आहे तो?
sri lanka flag
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 23, 2024 | 4:34 PM

टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यात टी20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडिया सोमवारी श्रीलंकेत दाखल झाली आहे. सूर्यकुमार यादव टी20 आणि वनडे सीरिजमध्ये रोहित शर्मा नेतृत्व करणार आहे. रोहितच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादवची टी 20i पूर्णवेळ कॅप्टन केल्यानंतर ही पहिलीच वेळ असणार आहे. तसेच गौतम गंभीर याची देखील ही हेड कोच म्हणून पहिलीच मालिका आहे. उभयसंघातील टी 20 मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होत आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी संघ जाहीर केली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

चरिथ असलांका हा श्रीलंकेचं नेतृ्त्व करणार आहे. टी 20 मालिकेतून श्रीलंका टीममध्ये दिनेश चांदीमल याचं तब्बल 2 वर्षांनी पुनरागमन झालं आहे. चांदीमलने अखेरचा टी 20 सामना हा 2022 साली खेळला होता. चांदीमलने टी20 कारकीर्दीतील 68 सामन्यांमध्ये 6 अर्धशतकांसह 1 हजार 62 धावा केल्या आहेत. तसेच दिनेशने टीम इंडिया विरुद्ध 9 टी20 सामन्यांमध्ये 104 धावा केल्या आहेत.

टी 20 मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 27 जुलै, संध्याकाळी 7 वाजता

दुसरा सामना, 28 जुलै, संध्याकाळी 7 वाजता

तिसरा सामना, 30 जुलै, संध्याकाळी 7 वाजता

टी 20 मालिकेसाठी 16 सदस्यीय संघ

टी 20 सीरिजसाठी श्रीलंका टीम: चरिथ असलांका (कॅप्टन), पथुम निसांका, कुसल परेरा ,अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चांदीमल, कामिंदु मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेल्लालागे ,महेश तीक्षाना,चामिंडु विक्रमसिंघे, मथीशा पथिराना,नुवान तुषारा, दुष्मंथा चमीरा आणि बिनुरा फर्नांडो.

टी20i मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकप्तान), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.