SL vs PAK: फायनलआधी भारतीय फॅन्सचा अपमान, स्टेडियममधून धक्के मारुन बाहेर काढलं, VIDEO

SL vs PAK: भारतीय चाहत्यांना टीम इंडियाला आशिया कपच्या फायनलमध्ये खेळताना पहायच होतं. पण हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. रोहित शर्माच्या टीमच फायनलमध्ये पोहोचण्याआधीच आव्हान संपुष्टात आलं.

SL vs PAK: फायनलआधी भारतीय फॅन्सचा अपमान, स्टेडियममधून धक्के मारुन बाहेर काढलं, VIDEO
indian fan
| Updated on: Sep 12, 2022 | 3:49 PM

मुंबई: भारतीय चाहत्यांना टीम इंडियाला आशिया कपच्या फायनलमध्ये खेळताना पहायच होतं. पण हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. रोहित शर्माच्या टीमच फायनलमध्ये पोहोचण्याआधीच आव्हान संपुष्टात आलं. भारतीय चाहत्यांसाठी यापेक्षा जास्त दु:खद काही असू शकत नाही. मात्र, तरीही भारतीय चाहते पाकिस्तान-श्रीलंका फायनलचा आनंद लुटण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले होते. पण तिथे त्यांच्यासोबत गैरवर्तन करण्यात आलं. त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली.

भारत आर्मी म्हणून ओळखलं जातं

भारतीय चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला नाही. टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी ठराविक चाहते नेहमी स्टेडियमवर उपस्थित असतात. या चाहत्यांना भारत आर्मी म्हणून ओळखलं जातं. यावेळी सुद्धा टीम इंडियाचा जोश वाढवण्यासाठी हे चाहते दुबईमध्ये उपस्थित होते.

पण क्रिकेटच्या वेडापायी हे चाहते….

या फॅन ग्रुपने प्रत्येक मॅचमध्ये स्टेडियमवर जाऊन टीम इंडियाचा जोश वाढवला. दुर्देवाने टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली नाही. पण क्रिकेटच्या वेडापायी हे चाहते पाकिस्तान-श्रीलंका फायनल पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आले होते.

स्टेडियममध्ये प्रवेश दिला नाही

स्टेडियममध्ये या चाहत्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यामुळे भारतीय चाहते संतापले होते. या फॅन ग्रुपचे 3 सदस्य फायनल पाहण्यासाठी स्टेडिययममध्ये आले होते. मात्र सुरक्षरक्षकांनी त्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला नाही. त्यानंतर या चाहत्यांनी व्हिडिओ काढून त्यांना काय सहन कराव लागलं? त्या बद्दल सांगितलं.

त्यांना धक्के मारुन बाहेर काढलं

टीम इंडियाच समर्थन करणारी जर्सी घातल्यामुळे या चाहत्यांना सुरक्षारक्षकांनी रोखलं. त्यांना धक्के मारुन बाहेर काढलं. आयसीसी किंवा स्पर्धेचे आयोजक आशियाई क्रिकेट काऊन्सिलने असे निर्देश दिले होते का? असा सवाल त्या चाहत्यांनी विचारला आहे.