Smriti Mandhana: तेनु ले के मैं जवांगा…स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचा तुफान डान्स, Video Viral, तुम्ही पाहिला का?
Smriti Mandhana Palash Muchhal Wedding: सांगलीत महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार, निर्माता पलाश मुच्छल यांचा विवाह आज सांगलीत होत आहे. पण त्याअगोदर त्यांचे अनेक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Smriti Mandhana Palash Muchhal Dance Video: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि धडाकेबाज खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार, निर्माता पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा आज होत आहे. सांगलीतील समडोळी फाटा येथील मानधना फार्म हाऊस येथे दोघेही लग्न बंधनात अडकतील. या सोहळ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंचे आगमन झाले आहेत. तर या सोहळ्याला अनेक दिग्गज हजेरी लावण्याची शक्यता आहे. पण त्यापूर्वी यादोघांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर धूमशान घालत आहेत. त्यातील हा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
तेनु ले के मैं जवांगा
इंटरनेटवर हा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात स्मृती आणि पलाश लग्नापूर्वी एका समारंभात असल्याचे दिसते. व्हिडिओत स्मृती आणि पलाश दोघेही रोमँटिक पद्धतीने फेर धरताना दिसतात. तेनु ले के मैं जवांगा…या प्रसिद्ध गाण्यावर दोघांनही धमाल उडवलेली दिसते. या दोघांच्या नृत्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिल्याचे दिसते. त्यांच्या डान्सवेळी शिट्ट्या आणि टाळ्यांनी माहोल तयार झाल्याचे दिसून येते.
डान्सची एकच चर्चा
स्मृतीच्या हातात एक जण हार देतो. ती हार हातात घेत ठुमकत येते आणि पलाशच्या गळ्यात हार घालते. त्याचवेळी ससुराल मैं जाऊंगी हे गाण वाजतं आणि नंतर दोघेही या तालावर ताल धरतात. मैदानावर जबरदस्त कामगिरी करणारी स्मृती नृत्यातही सरस असल्याचे दिसते. तर पलाशही तिला चांगली साथ देताना या व्हिडिओत दिसतो. हा व्हिडिओ पाहून चाहते हे मेड फॉर इच अदर असे कपल असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. या दोघांमधील रोमँटिक केमेस्ट्री या नृत्यातून जाणवते.
View this post on Instagram
या दोघांचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. स्मृती मानधना आणि पलाश हे गेल्या पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. पलाशने स्मृतीला क्रिकेटच्या मैदानावरच मागणी घातली आणि लग्नासाठी विचारणा केली. हा रोमँटिक व्हिडिओ अनेकांना भावला. तर भारतीय महिला क्रिकेट संघाचा समजो हो ही गया या गाण्यावरील व्हिडिओ सुद्धा नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतला. या व्हिडिओत भारतीय महिला क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू त्यांचा जलवा दाखवत आहेत. त्यांचा डान्सही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
