
दक्षिण आफ्रिकेने काही दिवसांपूर्वी लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा महाअंतिम सामन्यात धुव्वा उडवत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या ट्रॉफीवर नाव कोरलं. दक्षिण आफ्रिकेने टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. दक्षिण आफ्रिका या ऐतिहासिक विजयानंतर पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. दक्षिण आफ्रिका सध्या झिंबाब्वे दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिका या दौऱ्यात झिंबाब्वे विरुद्ध 2 कसोटी सामने खेळणार आहे. उभयसंघातील पहिला सामना हा 28 जून ते 2 जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेने प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे.
प्रोटियस मेन या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन 27 जून रोजी संध्याकाळी दक्षिण आफ्रिकेच्या अंतिम 11 खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेच्या या टीममध्ये बदल पाहायला मिळत आहे. झिंबाब्वे विरूद्धच्या या पहिल्या कसोटी सामन्यातून 3 खेळाडू पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत. त्या तिघांपैकी एक म्हणजे डेवाल्ड ब्रेव्हिस याचा समावेश आहे. ब्रेव्हीसने टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी करुन आपला ठसा उमटवला आहे.
झिंबाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीचा भाग नाही. त्यामुळे झिंबाब्वे विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये कर्णधार टेम्बा बावुमा, एडन मारक्रम आणि इतर मुख्य खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे टीममध्ये युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. तसेच टेम्बाच्या अनुपस्थितीत केशव महाराज याच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वाची धुरा आहे.
दक्षिण आफ्रिकेचे 11 शिलेदार
🚨 TEAM ANNOUNCEMENT 🚨
Captain Keshav Maharaj has confirmed the Starting XI for our Proteas Men ahead of tomorrow’s 1st Test against Zimbabwe 🏏🇿🇦.
A team ready to leave their mark in Bulawayo with flair and firepower 💪🔥.#WozaNawe pic.twitter.com/hvCSd0xkS0
— Proteas Men (@ProteasMenCSA) June 27, 2025
तसेच प्लेइंग ईलेव्हनमध्ये टोनी डी जॉर्जी आणि क्वेना मफाका यांचं कमबॅक झालं आहे. तसेच 3 युवा खेळाडूंना कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे. यामध्ये आयपीएल स्टार डेवाल्ड ब्रेव्हीस व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज-ऑलराउंडर कोडी युसूफ आणि स्फोटक फलंदाज लुअन ड्रे प्रिटोरियस याचा समावेश आहे. मात्र चाहत्यांचं डेवाल्डच्या कामगिरीकडे अधिक लक्ष असणार आहे.
झिंबाब्वे विरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग ईलेव्हन : केशव महाराज (कर्णधार), लुअन ड्रे प्रिटोरियस, टोनी डी जॉर्जी, मॅथ्यू ब्रीत्जके, वियान मुल्डर, डेविड बेडिंघम, डेवाल्ड ब्रेविस, काइल वेरेयना, कॉर्बिन बॉश, कोडी यूसुफ आणि क्वेना मफाका.