Icc T20i World Cup 2026 : टी 20i वर्ल्ड कपसाठी आणखी एका संघाची घोषणा, दोघांना डच्चू, पहिला सामना केव्हा?

South Africa Sqaud For Icc T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. निवड समितीकडून बहुतांश खेळाडूंना पहिल्यांदाच वर्ल्ड कप संघात संधी देण्यात आली आहे.

Icc T20i World Cup 2026 : टी 20i वर्ल्ड कपसाठी आणखी एका संघाची घोषणा, दोघांना डच्चू, पहिला सामना केव्हा?
India vs South Africa
Image Credit source: AP
| Updated on: Jan 02, 2026 | 7:28 PM

आगामी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला (Icc T20i World Cup 2026) 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर महाअंतिम सामना हा 8 मार्चला खेळवण्यात येणार आहे. भारत आणि श्रीलंकेकडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. भारताने या स्पर्धेसाठी सर्वातआधी संघ जाहीर केला. त्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची मालिका सुरु आहे. आता या स्पर्धेसाठी गतउपविजेत्या दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

एडन मार्रक्रम (Aiden Markram) पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेचं टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत नेतृत्व करणार आहे. वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याचा वर्ल्ड कप संघात समावेश करण्यात आला आहे. रबाडाला दुखापतीमुळे भारत दौऱ्यातील मालिकेला मुकावं लागलं होतं. तसेच रायन रिकेल्टन आणि ट्रिस्टन स्टब्स या दोघांना संधी मिळालेली नाही.

दक्षिण आफ्रिकेला मोठा दिलासा

कगिसो रबाडा हा दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. कगिसो फिट असल्याने दक्षिण आफ्रिकेला मोठा दिलासा आहे. कगिसोला बरगड्यांना झालेल्या दुखापतीमुळे टीममधून बाहेर रहावं लागलं होतं.

7 खेळाडूंची पहिल्यांदाच वर्ल्ड कप संघात निवड

निवड समितीने टी 20i वर्ल्ड कप संघात पहिल्यांदाच 7 खेळाडूंना संधी दिली आहे. या 7 खेळाडूंमध्ये कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेव्हीस, टॉनी डी जॉर्जी, डोनोवन फेरेरा, जॉर्ज लिंडे, क्वेना मफाका आणि जेसन स्मिथ यांचा समावेश आहे.

दक्षिण आफ्रिकेचे अनुभवी फलंदाज

एडन मारक्रम, डेव्हिड मिलर यासारखे अनुभवी आणि स्फोटक फलंदाजांचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच विकेटकीपर फलंदाज क्विंटन डी कॉक यालाही संधी देण्यात आली आहे. क्विंटनने काही महिन्यांआधीच टी 20i क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे.

डच्चू कुणाला?

निवड समितीने रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स व्यतिरिक्त रिझा हेंड्रिक्स, ओटनिल बार्टमॅन, गेराल्ड कोएत्झी, ब्योर्न फोर्टुइन आणि तबरेज शम्सी यांना वगळणयात आलं आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर

दक्षिण आफ्रिका डी ग्रुपमध्ये

दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा या स्पर्धेसाठी डी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये अफगाणिस्तान, कॅनडा, न्यूझीलंड आणि यूएईचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिका या मोहिमेतील आपला पहिला सामना हा 9 फेब्रुवारीला कॅनडा विरुद्ध खेळणार आहे.

टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ : एडन मार्रक्रम (कॅप्टन), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेव्हीस, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टॉनी डी झॉर्जी, डोनोवन फरेरा, मार्को यान्सेन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना मफाका, डेव्हीड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिक नॉर्खिया, कगिसो रबाडा आणि जेसन स्मिथ.