
झिंबाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात टी 20i ट्राय सीरिजचं आयोजन करण्यात आलं आहे. या 3 संघांमध्ये 14 ते 26 जुलै दरम्यान एकूण 7 सामन्यांचा थरार रंगणार आहे. या मालिकेच्या यजमानपदाचा मान झिंबाब्वेकडे आहे. या ट्राय सीरिजमध्ये तिन्ही संघ प्रत्येकी 4-4 सामने खेळणार आहेत. तर 26 जुलैला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहेत. या ट्राय सीरिजसाठी दक्षिण आफ्रिकेने 14 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. या मालिकेसाठी अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे.
विशेष म्हणजे हे सातही सामने हरारे स्पोर्ट्स क्लब या मैदानात खेळवण्यात येणार आहेत.त्यामुळे तिन्ही संघांचा प्रवास करण्याचा वेळ वाचेल.त्यामुळे या संघांना सरावासाठी अधिक वेळ देता येईल.
रासी वॅन डेर डुसेन ट्राय सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. एडन मारक्रमच्या अनुपस्थितीमुळे रासीला कर्णधार करण्यात आलं आहे. तसेच काही नियमित खेळाडूंना वर्कलोड मॅनेजमेंटनुसार विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. ‘बेबी एबी’ म्हणून ओळखला जाणारा युवा खेळाडू डेवाल्ड ब्रेव्हीस याला संधी देण्यात आली आहे. या निमित्ताने डेवाल्डचं दक्षिण आफ्रिका संघात जवळपास 2 वर्षांनी कमबॅक झालं आहे.
लुआन ड्रे प्रिटोरियस याने एसए 20 स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. लुआनला त्या खेळीच्या जोरावर पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात संधी देण्यतात आली आहे. तसेच कॉर्बिन बॉश याला टी 20I पदार्पण करण्याची संधी मिळणार आहे. तसेच एसए 20 स्पर्धेत रुबिन हरमन आणि सेनुरन मुथुसामी यांचीही निवड करण्यात आली आहेत.
नांद्रे बर्गर आणि जेराल्ड कुत्झिया या वेगवान गोलंदाजांच्या जोडीचं कमबॅक झालं आहे. हे दोन्ही वेगवान गोलंदाज दुखापतीतून रिकव्हर होत आहेत. दक्षिण आफ्रिकेसमोर या ट्राय सीरिजमधील पहिल्या सामन्यात 14 जुलैला झिंबाब्वेचं आव्हान असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यांचं वेळापत्रक
Proteas Men’s head coach Shukri Conrad has named a 14-player squad for the upcoming T20 International (T20I) tri-series against hosts Zimbabwe and New Zealand, set to take place in Harare from 14 – 26 July.
Rassie van der Dussen will captain the side, which features four maiden… pic.twitter.com/4TCWkqlIKE
— Proteas Men (@ProteasMenCSA) June 26, 2025
ट्राय सीरिजसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ : रासी वॅन डेर डुसेन (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्जी, रीजा हेंड्रिक्स, रुबिन हरमन, जॉर्ज लिंडे, क्वेना मफाका, सेनुरन मुथुसामी, लुंगी एन्गिडी, नकाबा पीटर, लुआन ड्रे प्रिटोरियस आणि एंडिले सिमलेन.