भारत दक्षिण अफ्रिका कसोटी मालिकेसाठी कर्णधार बदलला, 15 सदस्यीय संघाची घोषणा

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा संपत नाही तोच भारत दक्षिण अफ्रिका कसोटी मालिका सुरु होणार आहे. दोन दिवसीय कसोटी मालिकेसाठी 20 दिवस आधीच संघ जाहीर केला आहे. या मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेने कर्णधार बदलला आहे.

भारत दक्षिण अफ्रिका कसोटी मालिकेसाठी कर्णधार बदलला, 15 सदस्यीय संघाची घोषणा
भारत दक्षिण अफ्रिका कसोटी मालिकेसाठी कर्णधार बदलला, 15 सदस्यीय संघाची घोषणा
Image Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Oct 27, 2025 | 4:11 PM

भारतीय संघाचं गेल्या काही दिवसांपासून व्यस्त वेळापत्रक आहे. आशिया कप स्पर्धेनंतर वेस्ट कसोटी मालिका, त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौरा सुरु आहे. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतताच भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकन संघाने कंबर कसली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. दोन्ही संघांना विजयी टक्केवारी सुधारण्याची मोठी संधी या मालिकेतून मिळणार आहे. भारताने या मालिकेत दक्षिण अफ्रिकेला 2-0 ने मात दिली तर गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेणार आहे. तशीच संधी दक्षिण अफ्रिकेकडेही आहे. असं गणित असताना दक्षिण अफ्रिकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. दक्षिण अफ्रिकेने या संघांची धुरा टेम्बा बावुमा याच्या खांद्यावर दिली आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत टेम्बा बावुमा खेळला नव्हता. त्यामुळे संघाची धुरा एडन मार्करमने सांभाळली होती. मात्र आता फिट अँड फाईन असल्याने पुन्हा एकदा संघाची धुरा टेम्बा बावुमाकडे आली आहे. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वात दक्षिण अफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं जेतेपद मिळवलं होतं. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. आता दक्षिण अफ्रिकेने चांगली सुरुवात केली आहे. कसोटी मालिकेत पाकिस्तानला त्यांच्यात भूमीत 1-1ने रोखलं आहे.आता टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी कंबर कसली आहे. न्यूझीलंडने भारताला 3-0 ने पराभूत केलं होतं, ही प्रेरणा घेऊनच दक्षिण अफ्रिका मैदानात उतरणार आहे.

भारत दक्षिण अफ्रिका पहिला कसोटी सामना 14 नोव्हेंबरला कोलकात्यात होणार आहे. त्यानंतर दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरला गुवाहाटीत होणार आहे. त्यानंतर भारत दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होईल. ही मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरु होईल. ही मालिका संपल्यानंतर टी20 मालिकेची मेजवानी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. 9 डिसेंबर ते 19 डिसेंबरपर्यंत ही टी20 मालिका असणार आहे.

भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेचा संघ

टेम्बा बावुमा (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, मार्को यानसन, एडेन मारक्रम, जुबेर हमजा, केशव महाराज, रायन रिकल्टन, टोनी डी जॉर्जी, सेनुरन मुतुसामी, ट्रिस्टन स्टब्स, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, काइल वेरेने, वियान मूल्डर आणि सायमन हार्मर.