
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेची सध्या जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे या स्पर्धेपूर्वी काही खेळाडू तुफान फॉर्मात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. दक्षिण आफ्रिकेने नुकतंच ऑस्ट्रेलियाला वनडे मालिकेत पराभवाची धूळ चारली आहे. या सामन्यात हेन्रिक क्लासेन याची तुफान फलंदाजी पाहायला मिळाली होती. पण आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी न्यूझीलंड विरुद्धच्या सराव सामन्यात त्याने असं काही केलं की चर्चेचा विषय ठरला आहे. क्लासेननं असा चेंडू टाकला की फलंदाज आणि विकेटकीपर काहीच करू शकले. पण अवांतर पाच धावा मिळाल्या.
दक्षिण आफ्रिकन कर्णधाराने संघाचं 24 वं षटक क्लासेनच्या हाती सोपवलं. क्लासेन मीडियम पेसमध्ये गोलंदाजी करत होता. पण चौथा चेंडू टाकताना चेंडू हातून निसटला. हा चेंडू थेट फलंदाज आणि विकेटकीपरच्या वरून गेला. 30 यार्डच्या सर्कलजवळ पडला आणि थेट सीमापार गेला. क्लासेनचा हा चेंडू पाहून डिकॉक एकदम ओरडला.पण क्लासनने हा चेंडू मुद्दाम टाकला नव्हता. हातून चेंडू निसटल्यानं असं झालं होतं.
सराव सामन्यात कर्णधार एड मार्करम याने न्यूझीलंड विरुद्ध 9 गोलंदाजांना संधी दिली. क्लासेनकडूनही 3 षटकं टाकून घेतली. पण या तीन षटकात 23 धावा आल्या. वनडे वर्ल्डकपपूर्वी कोणता गोलंदाज प्रभावी ठरू शकतो. या उद्देशाने दक्षिण आफ्रिकेने इतके गोलंदाज वापरून पाहिले. न्यूझीलंडने 50 षटकात 6 गडी गमवून 321 धावा केल्या आणि विजयासाठी 322 धावांचं आव्हान दिलं आहे. आता आव्हान दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज कसं पेलतात? याबाबत उत्सुकता आहे.
न्यूझीलंडकडून डेवॉन कनव्हेनं जबरदस्त फलंदाजी केली. पहिल्या सराव सामन्यात शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सराव सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली. 73 चेंडूत 78 धावा केल्या. त्याने 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 78 धावा केल्या. त्यानंतर कॉनव्हे रिटायर्ड हर्ट झाला. त्यासोबत टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स यांनीही चांगली फलंदाजी केली. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती.