IND vs SA: रोहितच्या अनुपस्थितीत, विराट असूनही ‘या’ खेळाडूकडे दिली जाऊ शकते वनडेची कॅप्टनशिप

दुखापतग्रस्त रोहित शर्मा काही दिवसांपूर्वी बंगळुरुच्या एनसीएमध्ये फिटनेससाठी दाखल झाला होता. अजूनही तो तिथेच आहे.

IND vs SA: रोहितच्या अनुपस्थितीत, विराट असूनही या खेळाडूकडे दिली जाऊ शकते वनडेची कॅप्टनशिप
Rohit Sharma Virat Kohli
| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 3:33 PM

मुंबई: हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित शर्माला (Rohit sharma) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागले. रोहित शर्मा वनडे आणि टी-20 टीमचा कॅप्टन आहे. कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी सुद्धा त्याची निवड करण्यात आली आहे. सध्या त्याच्याजागी केएल राहुल (Kl Rahul) कसोटी संघाचे उपकर्णधारपद भूषवत आहे. राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत शानदार शतक झळकवून आपली निवड सार्थ ठरवली आहे.

दुखापतग्रस्त रोहित शर्मा काही दिवसांपूर्वी बंगळुरुच्या एनसीएमध्ये फिटनेससाठी दाखल झाला होता. अजूनही तो तिथेच आहे. रोहित दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी दुखापतीमधून सावरला नाही, तर त्याच्याजागी केएल राहुलची निवड केली जाऊ शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत राहुलला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. एकदिवसीय मालिकेसाठी अजूनही संघ निवड जाहीर करण्यात आलेली नाही.

“रोहित शर्मा अजूनही पूर्णपणे फिट नाहीय. रोहित शर्मा वेळेत दुखापतीमधून सावरला नाही, तर त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पाठवणं व्यवहार्य ठरणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुलकडे संघाचे नेतृत्व सोपवले जाऊ शकते” असे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

विराट कोहलीनेही तो एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध असल्याचे जाहीर केले आहे. याआधी रोहितला वनडे कॅप्टन बनवल्यामुळे विराट नाराज असून कौटुंबीक कारणांमुळे तो वनडे मालिकेत खेळणार नाही अशा बातम्या येत होत्या. पण दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराटने या सर्व अफवा आहे. मी असं कधीही म्हटलेलं नाही. मी वनडे मालिकेसाठी उपलब्ध आहे, असं सांगितलं.