IND vs SA: मोहम्मद शमीसाठी विराट कोहली मैदानावर अंपायरबरोबर भिडला

| Updated on: Jan 12, 2022 | 4:45 PM

सकाळी एडेन मार्कराम बाद झाल्यानंतर मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने भेदक मारा केला. योग्य टप्प्यावर गोलंदाजी करुन दक्षिण आफ्रिकन फलंदाजांवर दबाव टाकला.

IND vs SA: मोहम्मद शमीसाठी विराट कोहली मैदानावर अंपायरबरोबर भिडला
Follow us on

डरबन: केपटाऊनमध्ये (Capetown test) भारत आणि दक्षिण आफ्रिकेत मालिकेतील (India vs South Africa) तिसरा आणि अंतिम कसोटी सामना सुरु आहे. सकाळच्या पहिल्या सत्रात भारताने मार्कराम आणि केशव महाराजची विकेट मिळवली. आता पीटरसन (Peterson) आणि डुसेची जोडी जमली आहे. सकाळी एडेन मार्कराम बाद झाल्यानंतर मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने भेदक मारा केला. योग्य टप्प्यावर गोलंदाजी करुन दक्षिण आफ्रिकन फलंदाजांवर दबाव टाकला. विराट कोहली यावेळी मैदानावर सतत गोलंदाजांचा उत्साह वाढवत होता.

ते विराट कोहलीला पटलं नाही

पण त्याचवेळी पंचांनी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला इशारा दिला. ते विराट कोहलीला पटलं नाही. शमी गोलंदाजी करताना खेळपट्टीवरच्या डेंजर झोनमध्ये जात होता. त्यामुळे पंचांनी त्याला इशारा दिला. कोहलीला ते पटलं नाही. तो पंच माराइस इरास्मस यांच्याजवळ गेला व त्यांच्याशी बोलू लागला. फॉलोअप मध्ये शमी डेंजर भागात गेला नाही, असा विराटचा दावा होता.

मैदानावरील पंचांना अधिकार असतो

डेंजर भागापासून गोलंदाजांना दूर ठेवण्याचा मैदानावरील पंचांना अधिकार असतो. गोलंदाजी करताना फॉलोअपमध्ये बॉलर्स अनेकदा या भागात जातात. खेळपट्टी खराब होऊ नये, यासाठी ही काळजी घेतली जाते. कारण पीच खराब झाला तर गोलंदाजांचा फायदा असतो. शमी पंचाच्या जवळून गोलंदाजी करत होता. बुधवारी सकाळच्या सत्रात बुमराह आणि शमीने प्रत्येकी पाच षटक टाकली. न्यूलँडसच्या या खेळपट्टीवर त्यांनी चेंडूला आपल्या तालावर नाचवले. मालिकेचा निकाल निश्चित करणाऱ्या या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 223 धावांवर आटोपला. भारताकडून विराट कोहलीने कॅप्टन इनिंग खेळली व झुंजार 79 धावा केल्या.