Dale Steyn Retirement: भारत देश अक्षरश: वेडा आहे, निवृत्तीनंतर डेल स्टेनचं भारतीयांबद्दलचं ‘हे’ वक्तव्य वाचलत का?

| Updated on: Sep 01, 2021 | 4:33 PM

जागतिक क्रिकेटमधील एक दिग्गज गोलंदाज असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

Dale Steyn Retirement: भारत देश अक्षरश: वेडा आहे, निवृत्तीनंतर डेल स्टेनचं भारतीयांबद्दलचं हे वक्तव्य वाचलत का?
डेल स्टेन
Follow us on

मुंबई : सचिन तेंडुलकर, रिकी पॉटिंग या दिग्गजांच्या रांगेतील एक महान गोलंदाज दक्षिण आफ्रिकेचा स्विंग किंग डेल स्टेनने (Dale Steyn) नुकतीच क्रिकेटमधून निवृ्त्ती घेतली. मंगळवारी त्याने ट्विट करत आपला निर्णय सर्वांना सांगितला. यावेळी त्याने भावनिक पोस्टही लिहीली होती. निवृत्तीनंतर स्टेनने दक्षिण आफ्रिकेच्या मीडियाशी बोलताना आपला भारतातील अनुभवही शेअर केला.

यावेळी डेलने भारत आणि भारतीयांच्या क्रिकेटबद्दलच्या वेडाचा आवर्जून उल्लेख केला. तो म्हणाला, ”भारत अक्षरश: वेडा आहे! तुम्ही जेव्हाही भारतात फिरता तुम्हाला एखादा रॉकस्टार असल्यासारखं वाटतं. तुम्ही अगदी हॉलिवुड किंवा बॉलिवुड स्टार असल्यासारखं प्रेम मिळतं. भारतात सराव करतानाही अगदी हजारो लोक तुम्हाला बघायला येतात. इतकं प्रेम कुठेच मिळत नाही. मला हे सगळं नक्कीच आठवेल.”

डेल स्टेनची कारकिर्द

डेल स्टेनने 2004 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर हळू हळू एकदिवसीय संघात मग टी-20 संघातही डेलनं स्थान मिळवलं. विशेष म्हणजे तिन्ही फॉर्मेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जगातील काही खास बोलर्समध्ये स्टेनचा नंबर लागतो. डेल स्टेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबत आयपीएलही चांगलीच गाजवली. डेक्कन चार्जर्स, गुजरात लायन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैद्राबाद या संघाकडून खेळलेल्या स्टेनने सुरुवातीच्या पर्वात उत्तम कामगिरी केली होती. आता अखेरच्या काही पर्वात दुखापतींनी ग्रस्त डेलवरही विराट कोहलीने भरोसा दाखवत संघात खेळवलं होतं.

डेल स्टेनला दुखापतींनी ग्रासलं

डेल स्टेन 2008 साली दक्षिण आफ्रीका संघाकडून सर्वात जलदगतीने 100 कसोटी विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याने एका वर्षी 14 सामन्यात 18.10 च्या सरासरीने 86 विकेट्स घेत आयसीसी प्लेयर ऑफ द इयरचा खिताबही पटकावला होता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया गाजवल्यानंतर स्टेनने 2010 भारतीय भूमीवरही आपला जलवा दाखवला होता. त्याने नागपूरमध्ये एका सामन्यात 51 धावा देत सात विकेट्स मिळवल्या होत्या. पण हळूहळू दुखापतींनी स्टेनला ग्रासलं आणि त्याची गोलंदाजीतील कमाल कमी होऊ लागलीय त्याला हॅमस्ट्रिंग आणि खांद्याच्या दुखापतींमुळे क्रिकेटपासून दूर जावं लागलं. स्टेनच्या नावावर सर्वात जलद 400 कसोटी विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड आहे.

हे ही वाचा

IPL 2021: राजस्थान रॉयल्स संघाला आणखी एक झटका, बटलर, स्टोक्स, आर्चरनंतर आणखी एक इंग्लंडवासी दुखापतग्रस्त

Happy Birthday : सलामीच्या सामन्यात पाकिस्तानी फलंदाजाना पछाडलं, ‘हा’ ठरला भारताचा यशस्वी वेगवान गोलंदाज

IND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यात सूर्यकुमारला जागा नाही, माजी क्रिकेटपटूने सांगितले कारण

(South African Cricketer Dale steyn says india is crazy after retirement from Cricket)