Ranji Trophy च्या सेमीफायनलमध्य सेंच्युरी ठोकली, त्यानंतर क्रीडा मंत्र्यांनी I Love You लिहिलेला कागद दाखवला

| Updated on: Jun 16, 2022 | 3:33 PM

रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये पश्चिम बंगालचा संघ अडचणीत सापडला होता. त्यावेळी संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याची जबाबदारी राज्याच्या क्रीडा मंत्र्यांनी उचलली.

Ranji Trophy च्या सेमीफायनलमध्य सेंच्युरी ठोकली, त्यानंतर क्रीडा मंत्र्यांनी I Love You लिहिलेला कागद दाखवला
Manoj tiwary wife sushmita Roy
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई: रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये पश्चिम बंगालचा संघ अडचणीत सापडला होता. त्यावेळी संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याची जबाबदारी राज्याच्या क्रीडा मंत्र्यांनी उचलली. आम्ही मनोज तिवारी (Manoj Tiwary) बद्दल बोलतोय. ते पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री (West Bengal Sports Minister) आहेत. मागच्यावर्षी त्यांनी तृणमुल काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक जिंकली होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मनोज तिवारी यांना राज्याचं क्रीडा मंत्री बनवलं आहे. मनोज तिवारी स्वत: उत्तम क्रिकेटपटूही आहेत. मंत्री बनल्यानंतरही मनोज तिवारी यांनी क्रिकेट सोडलेलं नाही. ते अजूनही क्रिकेट खेळतात. सध्या रणजी करंडक स्पर्धेत नॉकआऊट म्हणजे बाद फेरीचे सामने सुरु आहेत. त्यांचा पश्चिम बंगालच्या रणजी संघात समावेश झालाय. क्वार्टर फायनलमध्ये शतक झळकावल्यानंतर मनोज तिवारीने आता सेमी फायनल मॅच मध्येही शतक ठोकलं आहे. यावेळी ठोकलेलं शतक थोडं खास आहे.

खास अंदाजात आय लव यू म्हटलं

मनोज तिवारीने रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पहिल्या डावात 211 चेंडू खेळले व 102 धावा केल्या. 205 चेंडू खेळून त्याने आपलं शतक पूर्ण केलं. त्यानंतर त्याने आपल्या कृतीने अनेकांचं मन जिंकून घेतलं. फर्स्ट क्लास क्रिकेट करियरमध्ये 29 व शतक झळकावल्यानंतर मनोज तिवारीने आपल्या कुटुंबाला खास अंदाजात आय लव यू म्हटलं. सहकार्याबद्दल त्याने कुटुंबाचे आभार मानले. त्याने कागदाच्या एका तुकड्यावर हार्टचा शेप बनवला. त्यावर पत्नी आणि मुलांची नाव लिहिली होती.

बायको सुष्मिता रॉय फक्त सुंदरच नाही, तर….

पश्चिम बंगालचा मध्य प्रदेश विरुद्ध रणजी सामना सुरु आहे. शतक झळकावल्यानंतर त्याने खिशातून कागद बाहेर काढला व पत्नी-मुलांबद्दल प्रेम व्यक्त केलं. मनोज तिवारीची बायको सुष्मिता रॉय फक्त सुंदरच नाही, तर सोशल मीडियावरही ती तितकीच Active असते. दोघे एका कॉमन मित्रामार्फत भेटले होते. भेटीगाठीचा सिलसिला पुढे असाच वाढत गेला. परस्परांना 7 वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं.

नॉकआउट स्टेजच्या तीन डावात दोन शतकं

मनोज तिवारी पश्चिम बंगालसाठी नॉकआउट स्टेजच्या तीन डावात दोन शतकं आणि एक अर्धशतक झळकावलं आहे. सेमीफायनलच्या पहिल्या डावात शतक झळकवण्याआधी त्याने क्वार्टर फायनलच्या पहिल्या डावात 73 आणि दुसऱ्याडावात 136 धावा केल्या आहेत.