
सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेन याने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 68 व्या सामन्यात इतिहास घडवला आहे. हेनरिक क्लासेन याने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये झंझावाती शतक झळकावलं आहे.हेनरिकने हैदराबादच्या हंगामातील शेवटच्या अर्थात 14 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ही कामगिरी केली. हेनरिकचं हे आयपीएलमधील दुसरं शतक ठरलं आहे. हेनरिकने या वादळी शतकासह अनेक विक्रमांची बरोबरी करण्यासह अनेक रेकॉर्ड्स ब्रेक केले आहेत.
सनरायजर्स हैदराबादचा विकेटकीपर बॅट्समन हेनरिक क्लासेन याने अवघ्या 37 बॉलमध्ये हे शतक पूर्ण केलं. हेनरिकने या शतकी खेळीत 6 चौकार आणि 9 षटकार लगावले. हेनरिक यासह सनरायजर्स हैदराबादसाठी आयपीएल इतिहासात वेगवान शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. हेनरिकने याबाबतीत ट्रेव्हिस हेड याचा रेकॉर्ड ब्रेक केला. हेडने 39 बॉलमध्ये शतक केलं होतं. हेडने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध आयपीएल 2024 मध्ये 15 एप्रिल रोजी ही कामगिरी केली होती.
हेनरिक क्लासेन याने या शतकासह माजी क्रिकेटर यूसुफ पठाण याच्या विक्रमाची बरोबरी केली. हेनरिक आयपीएलमध्ये संयुक्तरित्या वेगवान शतक करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. यूसुफ पठाण याने राजस्थान रॉयल्ससाठी मुंबई इंडियन्स विरुद्ध 13 मार्च 2010 रोजी हा कारनामा केला होता. तसेच काही दिवसांपूर्वीच राजस्थान रॉयल्सचा 14 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने इतिहास रचला होता. वैभवने गुजरात टायटन्स विरुद्ध 28 एप्रिलला 35 बॉलमध्ये शतक केलं होतं. वैभव यासह आयपीएलमध्ये वेगवान शतक करणारा एकूण दुसरा तर पहिला भारतीय फलंदाज ठरला होता. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 30 बॉलमध्ये शतक करण्याचा विक्रम हा ख्रिस गेल याच्या नावावर आहे. गेलने पुणे वॉरियर्स इंडिया या टीम विरुद्ध हा रेकॉर्ड केला होता. गेलचा हा रेकॉर्ड गेल्या अनेक वर्षांपासून अबाधित आहे.
हेनरिकने आयपीएलमधील या दुसऱ्या शतकासह रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली. हेनरिकने आयपीएलमध्ये रोहितच्या 2 शतकांच्या विक्रमाची बरोबरी साधली. रोहितने आयपीएलमध्ये 269 सामने खेळले आहेत. तर हेनरिकने 49 व्या सामन्यातच ही कामगिरी केलीय. हेनरिकने रोहितच्या तुलनेत 220 सामन्यांआधी ही कामगिरी करुन दाखवली.
हेनरिकची विक्रमी शतकी खेळी
37-ball 💯 🤯
Heinrich Klaasen smashes joint third-fastest #TATAIPL century 💥
🔽 Watch | #SRHvKKR
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2025
हेनरिकने या सामन्यात 39 बॉलमध्ये 269.23 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 105 रन्स केल्या. तसेच ट्रेव्हिस हेड याने 40 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 6 फोरसह 76 रन्स केल्या. तसते हैदराबादच्या इतर फलंदाजांनीही फटेकबाजी केली. हैदराबादने यासह आयपीएल इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या उभारली. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 278 धावा केल्या.