चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलिया फूसsss! वनडे मालिकेत श्रीलंकेकडून क्लीन स्वीप, स्टीव्ह स्मिथ म्हणाला…

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच्या लिटमस टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ फेल गेला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत 2-0 ने पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ फक्त 107 धावांवर ऑलआऊट झाला. हा सामना श्रीलंकेने 174 धावांनी जिंकला.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलिया फूसsss! वनडे मालिकेत श्रीलंकेकडून क्लीन स्वीप, स्टीव्ह स्मिथ म्हणाला...
Image Credit source: (Photo: Robert Cianflone/Getty Images)
| Updated on: Feb 14, 2025 | 4:57 PM

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. श्रीलंकने कोलंबो वनडेत ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने 50 षटकात 4 गडी गमवून 281 धावा केल्या आणि विजयासाठी 282 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान गाठताना ऑस्ट्रेलियाचा संघ 107 धावांवरच गारद झाला. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियावर 174 धावांना दणदणीत विजय मिळवला. ट्रेव्हिस हेड 18, कर्णधार स्टीव्हन स्मिथ 29 आणि जोश इंग्लिस याने 22 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही. शेपटच्या फलंदाजांनी तर मैदानात हजेरी लावली आणि तंबूत परतले. या मालिकेत सलग दुसऱ्यांदा फलंदाज फेल गेले. ऑस्ट्रेलियाचा आशिया देशाविरुद्ध हा सर्वात मोठ्या फरकाने पराभव आहे. इतकंच काय तर मालिकेत 2-0 ने क्लीन स्वीप मिळाला आहे. 43 वर्षानंतर श्रीलंकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश मिळाला आहे. 1982 मध्ये असं झालं होतं.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ म्हणाला की, ‘गेल्या दोन सामन्यांमध्ये आम्हाला पराभव पत्करावा लागला आहे. आम्ही येथे अनेक खेळाडूंचा वापर केला आहे. आम्ही पुढे जात राहिलो पण याचे श्रेय श्रीलंकेला जाते. त्यांनी या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या गोलंदाजांनी चांगले खेळले, या विकेटवर भेदक गोलंदाजी केली आणि परिस्थिती कठीण झाली. श्रीलंकेत हा एक मजेदार काळ होता, काही चांगल्या आठवणी होत्या. आम्ही आदरातिथ्याचे कौतुक करतो आणि काही चांगल्या क्रिकेटचा भाग असल्याचा आनंद घेतो.’

श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंका म्हणाला की, ‘मला वाटतं यशासाठी कोणताही मंत्र नाही, मला फक्त संघासाठी मोठे शतक झळकावायचे आहे आणि नंतर गोलंदाजांनी 3-4 विकेट घ्यायच्या आहेत. आज कमी उसळी होती पण हालचाल फारशी नव्हती. मला वाटतं त्यांनी (ऑस्ट्रेलिया) चांगली गोलंदाजी केली, पण आज आमचा दिवस होता.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, जेक फ्रेझर-मॅकगर्क, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), जोश इंगलिस (यष्टीरक्षक), आरोन हार्डी, ग्लेन मॅक्सवेल, शॉन अ‍ॅबॉट, बेन द्वारशुइस, अ‍ॅडम झांपा, तनवीर संघा.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, निशान मदुष्का, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, चरिथ असलंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, एशान मलिंगा, असिथा फर्नांडो