RCB संघासाठी ‘थोडी खुशी, थोडा गम’, ‘या’ दोन परदेशी खेळाडूंना खेळण्याची परवानगी, पण नाही खेळू शकणार संपूर्ण आयपीएल  

| Updated on: Aug 29, 2021 | 4:59 PM

कोरोनाच्या संकटामुळे मे महिन्यात मध्येच थांबवण्यात आलेली उर्वरीत आयपीएल युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. सर्व संघ आपआपली रणनीती आखण्यात व्यस्त असताना विराटच्या आरसीबी संघाने मोठे बदल केले आहेत.

RCB संघासाठी थोडी खुशी, थोडा गम, या दोन परदेशी खेळाडूंना खेळण्याची परवानगी, पण नाही खेळू शकणार संपूर्ण आयपीएल  
आरसीबी संघ
Follow us on

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian premier league) 14 व्या सीजनचे उर्वरीत सामने 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरु होणार आहेत. आतापर्यंत झालेल्या सामन्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) संघाने मोठे बदल करत काही धाकड खेळाडूंना संघात समाविष्ट केलं आहे. नुकताच संघ यूएईला रवाना झाला असून कर्णधार विराट कोहलीशिवाय संघ युएईला पोहोचला आहे. दरम्यान संघात नव्याने सामिल केलेल्या खेळाडूंबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. संघात नव्याने आलेले श्रीलंकेचे धाकड खेळाडू दुष्मंता चमीरा (Dushmantha Chameera) आणि वानिन्दु हसारंगा (Wanindu Hasaranga) यांना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने परवानगी दिली आहे. पण सोबतच एक अटही ठेवली आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार श्रीलंका संघाचे दोन खेळाडूंना आयपीएलसाठी RCB संघासोबत जोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. दोघेबी 15 सप्टेंबरपासून RCB संघासोबत जोडणार असून याआधी दोघेही श्रीलंका संघातून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून खेळणार आहेत.

आयपीएल सुरु असतानाच माघारी परतावे लागणार

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दोन्ही खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली आहे. मात्र सोबत एक अटही ठेवली आहे. दोन्ही खेळाडूंना 10 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा श्रीलंका संघासोबत जोडावे लागणार आहे. कारण ऑक्टोबरमध्ये सुरु होणाऱ्या टी-20 विश्व चषकासाठी श्रीलंका संघ खेळणार असलेल्या सराव सामन्यात दोघांनाही खेळावे लागणार आहे. त्यामुळे दोन्हीही खेळाडू प्लेऑफच्या सामन्यांपूर्वीच आयपीएलमधून माघार घेतील.

आरसीबी संघात चार नवे बदल

आरसीबी संघाने सर्वात मोठा बदल म्हणजे श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाची डोकेदुखी वाढवणाऱ्या श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा  याला करारबद्ध केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज अॅडम झाम्पाच्या जागी हसरंगाला  घेण्यात आलं आहे.  हसरंगासह श्रीलंकेचा आणखी एक खेळाडू यासह दुष्मंथा चमिरा यालादेखील आरसीबीने संघात घेतलं आहे. तो केन रिचर्डसनच्या बदली खेळणार आहे. तर टीम डेव्हिड हा फिन एलनला रिप्लेस करणार आहे. तर केन रिचर्डसनला जिओर्जी गार्टोन बदली खेळाडू म्हणून खेळणार आहे.

इतर बातम्या

IPL 2021: आरसीबीचा संघ कर्णधार विराट शिवाय युएईला रवाना, संघामध्ये काही महत्त्वाचे बदल

IPL 2021: UAE मध्ये मुंबई आणि चेन्नई संघाची धमाल, कोणी खेळतंय फुटबॉल तर कोणी वॉलीबॉल, पाहा VIDEO

VIDEO : कॅप्टन कूल धोनी बनला रॉकस्टार, उर्वरीत IPL ची दणकेबाज घोषणा, म्हणतो ‘पिक्चर अभी बाकी है’

(Sri lanka cricket gives permission to wanindu hasaranga and dushmantha chameera join rcb but has to come in middle for WC)