AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs CSK IPL 2023 Final : ‘आम्हाला फरक पडत नाही’, फायनलआधी CSK च्या कोचच गुजरातला ओपन चॅलेंज

GT vs CSK IPL 2023 Final : CSK चे कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी काय म्हटलय?. दोन्ही टीम्सनी सीजनमध्ये शानदार खेळ दाखवलाय. गुजरात टायटन्सने मागच्यावर्षी डेब्यु सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सला नमवून आयपीएलच जेतेपद पटकावलं होतं.

GT vs CSK IPL 2023 Final : 'आम्हाला फरक पडत नाही', फायनलआधी CSK च्या कोचच गुजरातला ओपन चॅलेंज
CSK Coach stephen fleming IPL 2023Image Credit source: IPL
| Updated on: May 28, 2023 | 6:53 PM
Share

अहमदाबाद : चेन्नई सुपर किंग्स आज आयपीएलमधल्या पाचव्या विजेतेपदासाठी भिडणार आहे. त्यांच्यासमोर विद्यमान चॅम्पियन गुजरात टायटन्सच आव्हान आहे. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मॅच होणार आहे. या फायनल मॅचआधी चेन्नईचे कोच स्टिफन फ्लेमिंग यांनी हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सला खुल आव्हान दिलय. फायनलमध्ये कशीही परिस्थिती असो, आमची टीम प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार आहे, असं चेन्नईचे कोच फ्लेमिंग म्हणाले.

चेन्नई आपल्या 14 सीजनमध्ये 10 व्यांदा फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. गुजरात टायटन्सची फायनल खेळण्याची ही दुसरीवेळ आहे. दोन्ही टीम्सनी सीजनमध्ये शानदार खेळ दाखवलाय. गुजरात टायटन्सने मागच्यावर्षी डेब्यु सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सला नमवून आयपीएलच जेतेपद पटकावलं होतं.

फरक पडत नाही

क्रिकेटमध्ये परिस्थिती महत्वाची असते. पीच कसा आहे? मॅच कुठे होणार आहे? कोणाच्या घरच्या मैदानावर मॅच होणार आहे? या सर्व गोष्टी महत्वाच्या ठरतात. फायनलचा सामना गुजरातच्या घरच्या मैदानावर आहे. सहाजिकच त्यांचा जास्त फायदा असणार आहे.

पण चेन्नईच्या टीमला याने फरक पडत नाही. चेन्नईच्या टीमला घराच्या बाहेर खेळताना काही अडचणी आल्या. त्यांनी संघर्ष केला, असं फ्लेमिंग म्हणाले. “आता आम्ही फायनलमध्ये काय परिस्थिती असेल? याची चिंता करत नाही. मानसिक दृष्ट्या आम्ही पहिल्यापेक्षा चांगल्या स्थितीत आहोत” असं फ्लेमिंग म्हणाले. चेन्नईची टीम शेवटची फायनल कधी खेळलेली?

ही मोठी संधी असून टीम उत्साहात आहे, असं फ्लेमिंग यांनी म्हटलय. आमच्याकडे चांगले खेळाडू असून फायनलमध्ये गुजरातच्या प्रत्येक आव्हान सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं फ्लेमिंग यांनी सांगितलं. चेन्नईने आपला शेवटचा फायनल सामना 2021 मध्ये खेळला होता. कोलकाता नाइट रायडर्सला हरवून विजेतेपद मिळवलं होतं. मागचा सीजन सीएसकेसाठी खराब होता. चेन्नईची टीम प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नव्हती.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा