IND vs ENG : ‘सामना खेळण्यापेक्षा तो पाहणं अधिक कठीण’, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूनं व्यक्त केल्या भावना

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत भारताने 1-0 ची आघाडी घेतली आहे. लॉर्ड्सवर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला भारताने 151 धावांनी पराभूत केलं.

IND vs ENG : सामना खेळण्यापेक्षा तो पाहणं अधिक कठीण, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूनं व्यक्त केल्या भावना
स्टुअर्ट ब्रॉड
| Edited By: | Updated on: Aug 17, 2021 | 6:20 PM

लंडन :  ऐतिहासिक लॉर्ड्सच्या (Lord’s) मैदानात अखेर भारताने इंग्लंडवर दमदार विजय मिळवला. पाच दिवस चाललेल्या कसोटी सामन्यात भारताने 151 धावांनी दिमाखदार विजय मिळवला. या विजायनंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये आनंदोत्सवर साजरा होत होता. मात्र इंग्लंडचा संघ अत्यंत निराश दिसून आला. दरम्यान इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज स्टुवर्ट ब्रॉडने (Stuart Broad) देखील सामना सुरु असताना एक ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या

दुखापतीमुळे सामन्याबाहेर असणाऱ्या ब्रॉडने ट्विटमध्ये लिहिलं की, ‘खरं सांगू तर सामना पाहणं हे सामना खेळण्यापेक्षा खूप जास्त कठीण आहे.’ ब्रॉडच्या या ट्विटमधून तो इतक्या महत्त्वाच्या मालिकेत संघात नसल्याचं किती दुख त्याला झालं आहे. हे दिसून येत आहे. ब्रॉड हा इंग्लंड संघाचा एक महत्त्वाचा गोलंदाज असून सध्या खेळणाऱ्यांमध्ये जेम्स अँडरसननंतर तो सर्वात वरिष्ट गोलंदाज आहे.

दुखापतीमुळे ब्रॉड मालिकेबाहेर

दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी लॉर्ड्स मैदानात वॉर्म अप करताना ब्रॉडच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुले ब्रॉडला त्याच्या 150 व्या कसोटी सामन्याला मुकावे लागले होते. त्याची दुखापत गंभीर असल्याने ही संपूर्ण भारताविरुद्धची मालिका तो खेळू शकणार नसल्याने इंग्लंडच्या संघावरील ताण अधिक वाढला आहे.

भारत आणि इंग्लंडमधील उर्वरीत कसोटी मालिकांचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट (सामना अनिर्णीत)

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट (भारत विजयी)

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

इतर बातम्या

IND vs ENG : असं काय घडलं? ज्यानंतर भारताने सामना अनिर्णीत न सोडता जिंकायचाच ठरवलं, विराटने दिलं उत्तर

IND vs ENG : बुमराह नडला, सिराज लॉर्ड्सवर थेट भिडला, भारताचा इंग्लंडवर थरारक विजय

IND vs ENG : लॉर्ड्सवरील विजयानंतर विराट आणि रोहितचा आनंद गगनात मावेना, पाहा VIDEO

(Stuart Broad Sad tweet While lossing Lords test says its hard to watch game than playing)