Sourav ganguly IPL 2023 : सुनील गावस्करांनी आपल्या लेखातून सौरव गांगुलीवर साधला निशाणा, म्हणाले…..

| Updated on: May 24, 2023 | 7:25 PM

Sourav ganguly IPL 2023 : सुनील गावस्कर हे परखड मत मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी अनेकदा कॅमेऱ्यासमोर बोलताना मोठ्यातल्या मोठ्या क्रिकेटपटूला सुद्धा खडेबोल सुनावले आहेत.

Sourav ganguly IPL 2023 : सुनील गावस्करांनी आपल्या लेखातून सौरव गांगुलीवर साधला निशाणा, म्हणाले.....
sunil gavaskar on saurav ganguly
Follow us on

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सच्या टीमने IPL 2023 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला नाही. 2019 च्या आधी ही टीम प्लेऑफमध्ये पोहोचली होती. यावर्षी दिल्लीची टीम खूप खराब खेळली. दिल्लीची टीम आयपीएल 2023 मध्ये नवव्या स्थानावर होती. दिल्लीच्या टीमकडे जागतिक क्रिकेटमधील दोन यशस्वी कर्णधार सौरव गांगुली आणि रिकी पॉन्टिंग होते. हे दोन्ही माजी कर्णधार दिल्लीच्या सपोर्ट् स्टाफमध्ये आहेत. पण तरीही दिल्लीची टीम प्रभावी कामगिरी करु शकली नाही.

हे दोघे असूनही दिल्लीच्या टीमने चांगली प्रगती केली नाही, असं सुनील गावस्कर यांचं म्हणण आहे. दिल्लीची टीम यावेळी नियमित कॅप्टन ऋषभ पंत शिवाय खेळत होती. मागच्यावर्षी कार अपघातात ऋषभ पंत जखमी झाला. त्यामुळे तो या सीजनमध्ये खेळू शकला नाही. डेविड वॉर्नरने टीमच नेतृत्व केलं. वॉर्नरची बॅट चालली पण तो कॅप्टनशिपमध्ये फेल ठरला.

‘इंग्लिश क्रिकेटपटूंना भारतीय खेळाडू ओळखता येत नाहीत’

पॉन्टिंग असूनही दिल्लीच्या टीममध्ये सुधारणा झालेली नाही, असं सुनील गावस्कर यांचं मत आहे. दिल्लीने युवा खेळाडूंना जास्त संधी दिली नाही, असं, गावस्कर म्हणाले. स्पोर्टस्टारमधल्या आपल्या कॉलममध्ये गावस्कर म्हणाले की, “ज्या समस्या सहजतेने सुटायला पाहिजे होत्या, त्या सुटल्या नाहीत. भाषा यामध्ये मुख्य समस्या आहे. इंग्लिश क्रिकेटपटूंना भारतीय खेळाडू ओळखता येत नाहीत. त्यामुळे यश ढुल, प्रियम गर्ग, सर्फराज खान जास्त पुढे जाऊ शकले नाहीत”

अक्षर पटेलबद्दल गावस्करांच मत काय?

गावस्करांच्या मते, दिल्लीच्या टीमने ऑलराऊंडर अक्षर पटेलचा योग्य पद्धतीने वापर केला नाही. दिल्लीने अक्षरला फलंदाजीत प्रमोट करायला पाहिजे होतं. दिल्लीची टीम या आयपीएलमध्ये 14 सामने खेळली. त्यात त्यांना फक्त पाच सामन्यांमध्ये विजय मिळवता आला.