AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी सूर्यकुमार यादवचं थेट विधान, संघात कमबॅकसाठी म्हणाला की…

भारतीय संघाला टी20 वर्ल्डकप जिंकवून देणारा कर्णधाराला थेट संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. फॉर्म नसल्याचं सांगत संघातून बाहेर केलं गेलं. आता टीम इंडियात कमबॅकसाठी काय? या प्रश्नावर त्याने थेट उत्तर दिलं आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी सूर्यकुमार यादवचं थेट विधान, संघात कमबॅकसाठी म्हणाला की...
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी सूर्यकुमार यादवचं थेट विधान, संघात कमबॅकसाठी म्हणाला की...Image Credit source: PTI
| Updated on: Aug 28, 2026 | 3:47 PM
Share

भारतीय टी20 संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव संघात परतणार का? त्याच्या चाहत्यांना पुन्हा सुपला शॉट पाहायला मिळणार का? असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. कारण भारताला टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत जेतेपद मिळवून दिल्यानंतर सूर्यकुमारला बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे. वर्ल्डकप स्पर्धेत अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. वर्ल्डकप जिंकल्यानंतर आयपीएल स्पर्धा पार पडली आणि जून 2026 मध्ये आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली. यावेळी कर्णधाराच्या भूमिकेत असलेल्या सूर्यकुमार यादवलाच वगळण्यात आलं. इतकंच काय तर कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आलं. त्यामुळे गेले अडीच तीन महिने भारतीय संघातून बाहेर आणि कमबॅक करेल की नाही याबाबत साशंकता आहे.

काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

भारतीय संघाचा माजी टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवने पुनरागमनाबाबत सकारात्मक आणि स्पष्ट वक्तव्य केलं आहे. त्याने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी पत्रकारांना त्याला गराडा आणि प्रश्नांचा भडिमार केला. तेव्हा सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘पाहा, मी संघात पुनरागमन करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे आणि माझ्याकडून जे काही शक्य आहे ते सर्व मी करत आहे. जर आगामी काळात गोष्टी योग्य रीतीने जुळून आल्या, तर सर्व काही ठीक होईल आणि गोष्टी सुरळीत होतील.’ सूर्यकुमार यादवच्या वक्तव्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, त्याने अद्याप संघात पुनरागमनाच्या आशा सोडलेली नाही.

सूर्यकुमार पुनरागमन करेल का?

सूर्यकुमार यादवसाठी टीम इंडियाची दारं बंद झाल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. पण बीसीसीआयच्या सूत्रांनुसार सूर्यकुमारला अजूनही संघात परतण्याची संधी आहे. पण यासाठी त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणं आवश्यक आहे. सूर्यकुमार यादवला जुना फॉर्म पुन्हा मिळण्यासाठी आता आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी20 स्पर्धा आणि देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. त्यामुळे आगामी टी20 मालिकेत त्याला संधी मिळणार नाही, हे आता स्पष्ट आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतही त्याला डावललं जाईल.

Follow Us
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट.....
Maharashtra Drought : केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट दिल्लीत पाठवणार
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? महापालिकेच्या....
Mumbai Ritu Tawade : महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावरून वाद