
भारत-पाक सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पाकिस्तानसाठी एक धक्का देणारी बाब म्हणजे भारतीय संघात पाकिस्तानविरूद्ध असे दोन मॅचविनर खेळाडू आहेत जे पाकसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

हार्दिक पंड्या याने टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानसंघाविरूद्ध सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. हार्दिक पंड्या याने सर्वाधिक १२ विकेट घेतल्या आहेत.

दुसरा खेळाडू हा अर्शदीप असून त्याने पाकिस्तानविरूद्ध सहा विकेट घेतल्यात. सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

भारत-पाक सामना यॉर्कमधील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तानची वर्ल्ड कपमधील आकडेवारी पाहिली तर भारतीय संघाचा पारडं जड आहे. पाकिस्तानला फक्त एकच सामना जिंकता आला आहे.

आजच्या सामन्यासाठी भारताचा संभाव्य प्लेइंग 11 : भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.