AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गेम फिरला! दक्षिण अफ्रिकेला रोमारियो शेफर्ड पडला भारी, नवव्या स्थानावर आला आणि…

टी20 वर्ल्डकप सुपर 8 फेरीतील वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका सामना होत आहे. हा सामना भारताच्या दृष्टीने खूपच महत्वाचा आहे. या सामन्यात सुरुवातीला दक्षिण अफ्रिकेची पकड होती. मात्र रोमारियो शेफर्डने चित्र बदललं.

गेम फिरला! दक्षिण अफ्रिकेला रोमारियो शेफर्ड पडला भारी, नवव्या स्थानावर आला आणि...
गेम फिरला! दक्षिण अफ्रिकेला रोमारियो शेफर्ड पडला भारी, नवव्या स्थानावर आला आणि...Image Credit source: west indies cricket twitter
| Updated on: Feb 26, 2026 | 5:03 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर हा निर्णय योग्यच होता. कारण वेस्ट इंडिजचे आघाडीचे फलंदाज धडाधड बाद झाले. त्यामुळे या सामन्यावर दक्षिण अफ्रिकेची मजबूत पकड होती. वेस्ट इंडिजच्या 10.2 षटकात 83 धावा होत्या आणि 7 विकेट पडल्या होत्या. त्यामुळे वेस्ट इंडिजचा स्कोअर 150च्या आत असेल असं वाटलं होतं. पण नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रोमारियो शेफर्डने सर्व चित्र पालटलं. नवव्या विकेटसाठी जेसन होल्डरसोबत 57 चेंडूत 89 धावांची भागीदारी केली. तसेच संघाला संकटातून बाहेर काढलं. वेस्ट इंडिजने 20 षटकात 8 गडी गमवून 176 धावा केल्या आणि विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेसाठी वाटतं तितकं सोपं नाही.

रोमारियो शेफर्डने नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 37 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार मारत नाबाद 52 धावांची खेळी केली. त्याने 140.54 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आठव्या विकेटसाठी दुसऱ्या क्रमांकाची भागीदारी केली आहे. बेल्जियमच्या साबेर झखिल आणि सकलेने अलीने 2021 मध्ये आठव्या विकेटसाठी नाबाद 132 धावांची भागीदारी केली होती. वेस्ट इंडीजने टी20 मध्ये सहाव्यांदा आठव्या विकेटसाठी 50पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे, त्यापैकी सर्वच्या सर्व सहामध्ये रोमारियो शेफर्डचा सहभाग आहे हे विशेष.

पुरुषांच्या टी20 मध्ये नवव्या किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावरून 50 पेक्षा जास्त धावा करणारा रोमारियो शेफर्ड हा चौथा फलंदाज आहे. तर पूर्ण-सदस्यीय संघातून तन्झिम हसन सकीब (बांगलादेश) नंतर दुसरा आहे. त्याने गेल्या वर्षी लाहोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध 50 धावा केल्या होत्या.

टीम इंडियाची धाकधूक वाढली

वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिकेच्या सामना टीम इंडियाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यावरच उपांत्य फेरीचं गणित सुटणार आहे. हा सामना दक्षिण अफ्रिकेने जिंकला तर भारताला सोपी संधी आहे. पण हा सामना वेस्ट इंडिजने जिंकला तर मात्र कठीण होईल. त्यामुळे दक्षिण अफ्रिका 177 धावांचं आव्हान गाठणार का? असा प्रश्न भारतीय क्रीडाप्रेमींना पडला आहे.  अन्यथा भारताला दोन्ही सामन्यात विजय मिळवण्यासोबत नेट रनरेटचं गणितही सोडवावं लागेल.

Follow Us
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार