T20 World Cup: पाकिस्तान संघाची दर्यादिली, पहिल्यांदा नामिबियाला हरवलं नंतर ड्रेसिंग रुममध्ये जाऊन त्यांचं हृदय जिंकलं!

| Updated on: Nov 03, 2021 | 11:06 AM

ICC T20 विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघाने जबरदस्त फॉर्म कायम राखला आहे. पाकिस्तानने या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने नामिबियाचा पराभव करत उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले आहे आणि विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा पाकिस्तान पहिलाच संघ ठरलाय.

T20 World Cup: पाकिस्तान संघाची दर्यादिली, पहिल्यांदा नामिबियाला हरवलं नंतर ड्रेसिंग रुममध्ये जाऊन त्यांचं हृदय जिंकलं!
दक्षिण आफ्रिका
Follow us on

T20 World Cup: T20 World Cup:  ICC T20 विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघाने आपला जबरदस्त फॉर्म कायम राखला आहे. पाकिस्तानने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने नामिबियाचा पराभव करत उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले आहे आणि विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा पाकिस्तान पहिलाच संघ ठरलाय. पाकिस्तानने आतापर्यंत दाखवलेल्या परफॉर्मन्सने क्रिकेट रसिकांच्या डोळ्याचं पारणं फिटलंय. दरम्यान, पाकने नामिबियाला पराभूत केल्यानंतर स्पिरीट ऑफ गेम काय असतं, त्याची झलक दाखवली. पराभवानंतर पाकिस्तान संघाने नामिबियाचं ड्रेसिंग रुम गाठलं. यावेळी पाक खेळाडूंनी नामिबियाच्या खेळाडूंचा उत्साह वाढवला, त्यांना खास टिप्स दिल्या, नामिबियाच्या खेळाडूंशी आपुलकीने संवाद साधला.

पाकिस्तान संघ नामिबियाच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन त्यांच्या खेळाडूंना प्रोत्साहन देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तान संघाचे खेळाडू अधिकारी नामिबियाच्या ड्रेसिंगमध्ये जाऊन त्यांच्या खेळाडूंचा उत्साह वाढवताना दिसून येत आहेत. शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद हाफीज, हसन अली, फखर जमान आणि शादाब खान या व्हिडिओत दिसून येत आहे. पाकिस्तान संघाच्या अधिकाऱ्यांनी प्रथम नामिबियाच्या ड्रेसिंग रूममध्ये एन्ट्री केली आणि त्यांचं अभिनंदन केलं.

नामिबियाची पाकशी टक्कर 

या सामन्यात पाकिस्तानने नामिबियाचा 45 धावांनी पराभव केला. पण जिंकण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत झुंज दिली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने दोन गडी गमावून 189 धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने नाबाद 79 धावांची खेळी केली. यानंतर बाबर आझमने 70 धावा केल्या. मोहम्मद हाफीजने नाबाद 32 धावा केल्या. नामिबियाकडून क्रेग विल्यम्सने 40 धावा केल्या. स्टीफन बियर्डने 29 धावा केल्या. डेव्हिड विझाने नाबाद 43 धावा केल्या. तो संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. कर्णधार गेरहार्ड इरास्मसने 15 धावांची खेळी खेळली. पाकिस्तानच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर सर्वांनी सांघिक कामगिरी केली. हसन अलीला ब्रेकथ्रू मिळाला. इमाद वसीमलाही एक विकेट मिळाली. हॅरिस रौफ आणि शादाब खान यांनाही प्रत्येकी एक विकेट मिळाली.

असा राहिला प्रवास

नामिबियाने याआधी 2003 चा एकदिवसीय विश्वचषक खेळला होता. यावेळी दमदार कामगिरीच्या जोरावर विश्वचषकासाठी पात्र ठरण्यात नामिबियाचा संघ यशस्वी ठरला होता. यानंतर त्यांनी पहिल्या फेरीचा अडथळा पार करत सुपर-12 टप्प्यात पाऊल ठेवले. या फेरीतील पहिल्या सामन्यात त्यांनी स्कॉटलंडचा पराभव केला. यानंतर त्यांना अफगाणिस्तानकडून 62 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. त्यानंतर तिसर्‍या सामन्यात पाकिस्तानने त्यांना खिंडार पाडले. आता नामिबियाला न्यूझीलंड आणि भारताविरुद्धही सामना खेळायचे आहेत.

हे ही वाचा :

T20 World Cup 2021: रबाडा-नॉर्खियाच्या माऱ्यासमोर बांग्लादेश गारद, दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून विजय

विराटच्या मुलीला धमकावणारा होणार गजाआड, दिल्ली पोलिसांनी कसली कंबर

T20 World Cup नंतर भारतीय संघाचा कायापालट, दिग्गज खेळाडूंना विश्रांती, नव्या दमाचे क्रिकेटपटू मैदानात अवतरणार