T20 World Cup 2021 : ‘बुमराहसमोर शाहीन आफ्रिदी बच्चा’, पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवणाऱ्या खेळाडूची कबुली

| Updated on: Oct 22, 2021 | 10:52 AM

टी-20 विश्वचषक स्पर्धेत येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. त्या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये वातावरणनिर्मिती सुरु आहे.

T20 World Cup 2021 : बुमराहसमोर शाहीन आफ्रिदी बच्चा, पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवणाऱ्या खेळाडूची कबुली
Jasprit Bumrah - Shaheen Shah Afridi
Follow us on

मुंबई : टी-20 विश्वचषक स्पर्धेत येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. त्या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये वातावरणनिर्मिती सुरु आहे. दोन्ही देशांचे अनेक माजी खेळाडू आणि क्रीडी समीक्षक या सामन्याबद्दल आपापली मतं व्यक्त करत आहेत. दोन्ही संघातील खेळाडूंची आणि संघाची तुलना करत आहेत. अशीच तुलना भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहीन आफ्रिदी या दोघांमध्ये केली जात आहे. परंतु बुमराह आणि शाहीन आफ्रिदीची तुलना करणाऱ्यांना एका माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने सडेतोड उत्तर दिलं आहे. (T20 World Cup 2021: Shaheen Afridi is a child in front of Bumrah! says Mohammad Amir)

पाकिस्तानसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा खेळाडू मोहम्मद अमीर याने बुमराह आणि शाहीन आफ्रिदीची तुलना होऊ शकत नाही असं म्हटलं आहे, अमीर म्हणाला की, “ती व्यक्ती मूर्ख असेल जी शाहीन आफ्रिदीची तुलना जसप्रीत बुमराहशी करेल. बुमराहसमोर शाहीन आफ्रिदी अजून बच्चा आहे.”

डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानच्या विजयाचा नायक होता. अंतिम सामन्यात भारतावर विजय मिळवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आणि, आता तो टी -20 जगताबद्दल मोठी वक्तव्ये करताना दिसत आहे. यूएईमध्येच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याला बुमराह आणि शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने जे मत व्यक्त केलं ते भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या लोकांचे डोळे आणि कान उघडणारं होतं.

बुमराहसोबत शाहीनची तुलना करणं मुर्खपणा ठरेल : आमीर

मोहम्मद आमीर म्हणाला, “शाहीन आफ्रिदीची सध्या बुमराहशी बरोबरी करणे मूर्खपणाचे ठरेल. कारण, शाहीन अजून यंग आहे आणि शिकत आहे. दुसरीकडे, बुमराह बराच काळ टीम इंडियाकडून खेळत आहे. माझ्या मते, तो सध्या टी
-20 मध्ये जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये बुमराहचा सामना करणे अवघड आहे. पण शाहीन सध्या पाकिस्तानचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. गेल्या दीड वर्षांपासून तो उत्कृष्ट कामगिरी करत आहे.” आमिर म्हणाला, “तरीही दोघांमध्ये चांगली लढत होईल. कारण बुमराह नवीन चेंडूने चांगली कामगिरी करतो आणि शाहीन सध्या नवीन चेंडूसह सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे.”

बुमराह VS शाहीन

बुमराह आणि शाहीनच्या टी-20 क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर आंतरराष्ट्रीय खेळपट्टीवर दोघांमध्ये 20 सामन्यांचे अंतर आहे. बुमराहने आतापर्यंत 50 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 59 विकेट्स घेतल्या आहेत, तर शाहीन आफ्रिदीने आतापर्यंत 32 सामन्यांमध्ये 30 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहला पाकिस्तानविरुद्ध टी -20 खेळण्याचा अनुभव आहे. त्याने पाकिस्तान संघाविरुद्ध खेळलेल्या 2 टी-20 मध्ये 2 विकेट्स घेतल्या आहेत. तर शाहीन आफ्रिदीकडे भारताविरोधात खेळण्याचा अनुभव नाही.

इतर बातम्या

T20 World Cup 2021: ओमानला मात देत स्कॉटलंडची ऐतिहासिक कामगिरी, सुपर 12 मध्ये मिळवली एन्ट्री, आता सामना भारताशी

‘T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार’

IPL 2022 मध्ये कोणते 3 खेळाडू मुंबई इंडियन्स करणार रिटेन?, दोन मॅच विनर्सचं भविष्य धोक्यात

(T20 World Cup 2021: Shaheen Afridi is a child in front of Bumrah! says Mohammad Amir)