IPL 2022 मध्ये कोणते 3 खेळाडू मुंबई इंडियन्स करणार रिटेन?, दोन मॅच विनर्सचं भविष्य धोक्यात

पाच वेळा आयपीएलचा खिताब जिंकलेल्या मुंबई इंडियन्स संघासाठी यंदाची आयपीएल (IPL 2021) खास ठरली नाही. त्यांना प्लेऑफमध्येही स्थान मिळवता आलं नाही. त्यामुळे पुढील वर्षी संघ कशी रणनीती आखणार हे पाहावं लागेलं.

1/5
आयपीएलचं पुढील पर्व अर्थात आय़पीएल 2022 (IPL 2022) मध्ये 8 च्या जागी 10 संघ सहभाग घेतील. त्यामुळे केवळ 3 खेळाडूंना रिटेन करण्याची अर्थात संघात ठेवण्याची परवानगी संघाना आहे. अशामध्ये मुंबई संघाचा (Mumbai Indians) विचार करता त्यांच्या तीन खेळाडूंमध्ये कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हे नाव नक्कीच असणार आहे. यात शंका नाही. त्याच्याच कर्णधारपदाखाली संघाने 5 वेळा स्पर्धा जिंकली आहे शिवाय तो जगातील अव्वल क्रमांकाच्या फलंदाजामध्येही मोडतो.

2/5
रोहितनंतरचं नाव म्हटलं तर ते सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे असू शकतं. मागील अनेक वर्ष संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सूर्याला रिटेन करण्याची दाट शक्यता आहे. कारण इतका चांगला फलंदाज गमावण्याची रिस्क मुंबई इंडियन्स कधीच घेणार नाही.

3/5
फलंदाजानंतर गोलंदाजीचा विचार करता मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) य़ाला मुंबई नक्कीच रिटेन करणार. संघाचा हुकुमी एक्का असणारा जसप्रीत यंदाही संघाक़डून सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळा़डू आहे.

4/5
यंदा केवळ तीनच खेळाडू रिटेन करण्याची परवानगी असल्याने संघातील अनेक महत्त्वाच्या खेळाडूंवर टांगती तलवार आहे. यातील बहुतेक जणांना संघ लिलावात घेईलचं पण तोवर रिस्क असणारचं आहे. यातील एक नाव म्हणजे स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दीक पंड्या. अलीकडे गोलंदाजी करत नसल्याने हार्दीकचं संघातील स्थान डळमळीत होत आहे. पण एक फिनीशर म्हणून तो नक्कीच एक नंबरला आहे.

5/5
युवा फलंदाज इशान किशनला अधिक सामन्यात संधी मिळत नाही. याचे कारण यष्टीरक्षक आणि सलामीवीर अशा इशानच्या दोन्ही जबाबदारी दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डिकॉक उत्तरित्या सांभाळत आहे. अशावेळी पुढील हंगामातील इशानचं भविष्य लिलावात स्पष्ट होईल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI