‘T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार’

भारताने दोन्ही सराव सामन्यात विजय मिळवला असून आता भारतीय खेळाडू थेट विश्वचषकातील पहिल्या सामन्यातचं मैदानात उतरतील. 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध भारत असा सामना रंगणार आहे.

'T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार'
पाकिस्तान क्रिकेट टीम (प्रातिनिधीक फोटो)
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 9:06 PM

T20 World Cup 2021 : भारत आणि पाकिस्तान (IND VS PAK) यांच्यात 24 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. दोघांचाही यंदाच्या टी20 विश्वचषकातील (T20 World Cup 2021) हा पहिला सामना असणार आहे. दरम्यान या भव्य स्पर्धेतील भव्य सामन्याआधी अनेक क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज विविध विधानं करत आहेत. यामध्येच आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या मते जर पाकिस्तान पहिलाच सामना भारताविरुद्ध पराभूत झाली तर सेमीफायनलच्या शर्यतीतूनही ते बाहेर जातील. यावेळी हॉगने त्याच्यामते सेमीफायनलमध्ये पोहोचणारे 4 संघही सांगितले.

एका शोमध्ये ब्रॅड हॉगने माजी भारतीय क्रिकेटर दीप दासगुप्ता यांच्याची बोलताना सांगितले की, ‘जर पाकिस्तान त्यांचा पहिलाच सामना जो भारतासोबत आहे तो पराभूत झाल्यास त्यांच्यासाठी फार अवघड होईल. कारण त्यानंतरचा सामनाही तगड्या न्यूझीलंडशी त्यांचा असणार आहे. तोही सामना अवघड असल्याने दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करणे पाकला अनिवार्य आहे. अन्यथा पाकिस्तानला पुढे जाता येणार नाही.

ऑस्ट्रेलियाचं सेमीफायनलमध्ये पोहचणं अवघड- हॉग

ब्रॅड हॉगने त्याचा माजी संघ ऑस्ट्रेलियालाबद्दल बोलताना त्यांच यंदा सेमीफायनलमध्ये पोहोचणं अवघड असल्याचं मत व्यक्त केलं. त्याच्यामते वेस्टइंडीज आणि इंग्लंड हे संघ सेमीफायनलसाठी प्रबळ दावेदार आहेत. त्यानंतर जर पाकास्तानने भारताला पराभूत केलं तर तेही सेमीफायनलमध्ये जातील असं मत हॉगने व्यक्त केलं आहे. पण आतापर्यंतचा इतिहास पाहता 5 वेळा टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि भारत आमने-सामने आले आहेत. या सर्ववेळी भारतच विजयी झाला आहे.

2 वर्षानंतर भारत, पाकिस्तान आमने-सामने

टी20 विश्वचषकाच्या गटामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ तब्बल 2 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने असतील. याआधी 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने होती. ज्यावेळी भारताने 89 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला होता.

इतर बातम्या

ठरलं की, आपला मुंबईकर रोहीत टीम इंडियाचा कॅप्टन होणार, T20 World Cup नंतर घोषणा

फिल्डिंग कोच आर. श्रीधरच्या जागी ‘या’ माजी भारतीय क्रिकेटपटूची वर्णी?, T20 World Cup नंतर होणार घोषणा

T20 World Cup 2021: श्रीलंकेचा आयर्लंडवर दमदार विजय, सुपर 12 मध्ये दणक्यात एन्ट्री

(If pakistan looses against india they may not qualify for semi final in t20 world cup says Brad hogg)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.