ठरलं की, आपला मुंबईकर रोहीत टीम इंडियाचा कॅप्टन होणार, T20 World Cup नंतर घोषणा

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. टी -20 विश्वचषकानंतर तो कर्णधारपदावरून पायउतार होईल. याबद्दलची माहिती विराटने स्वत: सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली होती.

ठरलं की, आपला मुंबईकर रोहीत टीम इंडियाचा कॅप्टन होणार, T20 World Cup नंतर घोषणा
भारतीय क्रिकेट संघ
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 4:20 PM

मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. टी -20 विश्वचषकानंतर तो कर्णधारपदावरून पायउतार होईल. ही बातमी काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. पण तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक क्रिकेट चाहत्याला पडलेला प्रश्न म्हणजे नेमकं हे कर्णधारपद मिळणार कोणाला? सध्या भारताकडे टी20 संघाचं कर्णधारपद सांभाळण्यासाठी काही चांगले पर्याय आहेत. यामध्ये रोहित शर्मा, केएल राहुल आणि ऋषभ पंत हे महत्त्वाचे पर्याय आहेत. पण हे पद उपकर्णधार रोहित शर्मा याला मिळणार असल्याचं इनसाइड स्पोर्ट नावाच्या वेबसाइटने सांगितलं असून त्यांना बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

संबधित रिपोर्टमध्ये बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, ‘रोहित शर्मा सध्या संघातील दिग्गज खेळाडू आहे. तो उपकर्णधारही असल्याने टी20 वर्ल्ड कपनंतर तोच विराटची जागा घेईल. याबद्दलचं अधिकृत वक्तव्य हे स्पर्धेनंतरच केलं जाईल.’ विराटने वर्कलोडचं कारण देत कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याने आतापर्यंत तीन महत्त्वात्या आयसीसी टूर्नामेंट खेळल्या. ज्यात 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2019 वर्ल्ड कप आणि 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप या स्पर्धा असून त्याने या तिन्हीमध्ये पराभवचं मिळवला आहे. ज्यानंतर आता त्याने हा निर्णय़ घेतला.

रोहित टी20 कर्णधारपद सांभाळण्यात यशस्वी

रोहित शर्माने आतापर्यंत जेव्हाही कर्णधारपद मिळालं आहे, तेव्हा त्याचा वापर अगदी योग्यरित्या केला आहे. त्यान आशिया कपसारख्या स्पर्धाही जिंकवून दिल्या असून टी20 कर्णधारपदाचा विचार करता आय़पीएलमधील रोहितचं प्रदर्शनचं यासाठी खूप आहे. जगातील सर्वात अवघड लीग असणाऱ्या आयपीएलमध्ये तब्बल 5 ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार असणाऱ्या रोहितच्या याच कामगिरीमुळे त्याला ही जबाबदारी दिली जाणार आहे. भारतीय संघाचा विचार करता रोहितने 19 टी20 सामन्यात भारताचं कर्णधारपद सांभाळलं असून त्यातील 15 सामन्यात विजय मिळवला आहे. कर्णधार असताना रोहितने 41.88 च्या सरासरीने 712 रनही केले आहेत.

इतर बातम्या

T20 World Cup: ‘हार्दिकच्या हाती बॅट असो वा बॉल, तो सहज मॅच पलटू शकतो’; दिग्गज खेळाडूची स्तुतीसुमने

T20 World Cup 2021: स्कॉटलंडच्या खेळाडूने भारतात घेतली स्पेशल ट्रेनिंग, विश्वचषकात रचला इतिहास

T20 World Cup मध्ये स्कॉटलंडच्या खेळासह जर्सीही फॅन्सना आवडली, 12 वर्षांची चिमुरडी आहे डिझायनर

(After T20 world cup Rohit Sharma to takeover indian t20 team captaincy after virat kohli says report)

Non Stop LIVE Update
लोकलने प्रवास करताय? ही बातमी वाचा! 'मरे'वर 36 तासांचा ब्लॉक, पण कुठे?
लोकलने प्रवास करताय? ही बातमी वाचा! 'मरे'वर 36 तासांचा ब्लॉक, पण कुठे?.
आला रे Monsoon केरळात आला, राज्यात 'या' दिवशी होणार मान्सूनची एन्ट्री
आला रे Monsoon केरळात आला, राज्यात 'या' दिवशी होणार मान्सूनची एन्ट्री.
दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सूरज चव्हाणांच्या टीकेनंतर उडाला भडका
दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सूरज चव्हाणांच्या टीकेनंतर उडाला भडका.
आव्हाडांना अटक होणार? 'त्या' कृतीवरून संताप, कुणी केली अटकेची मागणी?
आव्हाडांना अटक होणार? 'त्या' कृतीवरून संताप, कुणी केली अटकेची मागणी?.
Baramati : क्या बोलती पब्लिक? बारामतीकरांच्या मनात कोण? ताई की वहिनी?
Baramati : क्या बोलती पब्लिक? बारामतीकरांच्या मनात कोण? ताई की वहिनी?.
आव्हाडांना बाबासाहेबांचा फोटो नाही पुतळा...त्या कृतीनंतर कुणाचा संताप?
आव्हाडांना बाबासाहेबांचा फोटो नाही पुतळा...त्या कृतीनंतर कुणाचा संताप?.
शिंदेंच्या 'त्या' कायदेशीर नोटीला संजय राऊतांचं उत्तर, अब आयेगा मजा...
शिंदेंच्या 'त्या' कायदेशीर नोटीला संजय राऊतांचं उत्तर, अब आयेगा मजा....
मुख्यमंत्र्यांची राऊतांना कायदेशीर नोटीस, 3 दिवसांत माफी मागा अन्यथा..
मुख्यमंत्र्यांची राऊतांना कायदेशीर नोटीस, 3 दिवसांत माफी मागा अन्यथा...
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?.
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका.