स्कॉटलंडचा संघ यंदाच्या विश्वचषकात उत्तम कामगिरी करत आहे. आधी बांग्लादेशला पराभूत केल्यानंतर आता त्याने पापुआ न्यू गिनी या संघालाही 17 धावांनी मात देत आपला स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला आहे.
Oct 19, 2021 | 9:42 PM
टी20 विश्वचषकाला (T20 World Cup 2021) सुरुवात झाली असून सध्या ग्रुप स्टेजसचे सामने सुरु आहेत. यामध्ये यंदा विश्वचषक खेळणारा स्कॉटलंडचा संघ दमदार कामगिरी करत असून त्यांच्या अनोख्या जर्सीनेही चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
1 / 5
स्कॉटलंडची ही वांगी रंगाची जर्सी ज्यात वेगळ्याही काही शेड आहेत ती सर्वांना आवडत आहे. विशेष म्हणजे ही जर्सी तयार करणारी एक चिमुकली आहे.
2 / 5
या चिमुकलीचं नाव रेबेका डाउनी असं असून ती 12 वर्षांची आहे. स्कॉटलंडमध्ये राहणारी रेबेकाने संघाने विविध डिझायन नागरिकांकडून मागवले असताना तिचीही डिझायन पाठवली होती. जी संघ व्यवस्थापनाला आवडल्याने तशीच जर्सी छापली आहे.
3 / 5
स्कॉटलंडच्या एका खेळाडूने रेबेकाचा टीव्हीजवळ उभा असलेला फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली होती.
4 / 5
आतापर्यंत स्कॉटलंडच्या संघाने दोन विजय मिळवत त्यांच्या ग्रुपमध्ये आघाडी घेतली आहे. त्यांनी आज पापुआ न्यू गिनी या संघाला 17 धावांनी मात दिली. तर त्याआधी त्यांनी बांग्लादेशला पराभूत केलं होतं.