T20 World Cup: ‘हार्दिकच्या हाती बॅट असो वा बॉल, तो सहज मॅच पलटू शकतो’; दिग्गज खेळाडूची स्तुतीसुमने

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार की नाही यावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू डेल स्टेनने हार्दिक पंड्याबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे.

T20 World Cup: 'हार्दिकच्या हाती बॅट असो वा बॉल, तो सहज मॅच पलटू शकतो'; दिग्गज खेळाडूची स्तुतीसुमने
Hardik Pandya
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 3:00 PM

मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार की नाही यावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू डेल स्टेनने हार्दिक पंड्याबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे. हार्दिकला गेम चेंजर म्हणत स्टेन म्हणाला की, “विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ या स्टार अष्टपैलू खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून वगळू शकत नाही.” (T20 World Cup : Hardik Pandya is game changer, whether he’s got bat or ball in his hand : Dale Steyn)

टी -20 विश्वचषकात भारतीय संघ 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. याआधी, हार्दिक पंड्याच्या प्लेइंग इलेव्हनमधील स्थानाबद्दल अनेकांना शंका आहे. कारण नुकत्याच संपलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि इंग्लंडविरुद्ध भारताच्या पहिल्या सराव सामन्यात पांड्याने गोलंदाजी केली नाही.

स्टेनने स्टार स्पोर्ट्सला सांगितले, ‘तो गेम-चेंजर आहे, ही एक मोठी गोष्ट आहे. त्याच्या हातात बॅट किंवा बॉल असला तरी तो गेम चेंजर असल्याचे सिद्ध करू शकतो, विशेषत: फलंदाजीद्वारे, त्याच्याकडे गेम बदलण्याची क्षमता आहे. खरं सांगायचं तर त्याने अलीकडे जास्त गोलंदाजी केलेली नाही. मी त्याला त्याच्या फलंदाजीतील कामगिरीच्या जोरावर संघात ठेवू इच्छितो.

स्टेन म्हणाला, “त्याचा सध्याचा फॉर्म पाहता ही टच अँड गो परिस्थिती आहे, पण तो एक उत्तम खेळाडू आहे. आणि संघांना हे कळेल. म्हणून, जेव्हा तो फलंदाजीसाठी मैदानात उतरेल, तेव्हा संघांना त्यानुसार तयारी करावी लागेल, कारण हार्दिक पंड्या फलंदाजीच्या जोरावरही विरोधी संघाच्या हातचा सामना हिरावू शकतो.

उल्लेखनीय म्हणजे, सोमवारी भारताने इंग्लंडचा त्यांच्या पहिल्या सराव सामन्यात सात गडी राखून पराभव केला. इशान किशन (70) आणि केएल राहुल (51) यांनी टीम इंडियाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. आज (बुधवारी) भारताचा दुसरा सराव सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

आज भारताचा दुसरा सराव सामना

टी -20 विश्वचषकासाठी आपली तयारी आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने टीम इंडिया बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात उतरेल. भारताला स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात रविवारी पाकिस्तानशी खेळायचे आहे. कर्णधार म्हणून विराट कोहली आणि प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची ही शेवटची स्पर्धा आहे. हा सराव सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 पासून खेळवला जाईल.

टीम इंडिया त्यांच्या फलंदाजीच्या क्रमवारीची चाचणी घेईल. विराट ब्रिगेडसमोर दुसऱ्या आणि शेवटच्या सराव सामन्यात फलंदाजी क्रम निश्चित करण्याचे लक्ष्य आहे. इंग्लंडविरुद्ध सोमवारच्या सराव सामन्याआधी, कोहलीने म्हटले होते की, पहिले तीन क्रमांक निश्चित आहेत, केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली तर तो (कोहली) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.

इतर बातम्या

T20 World Cup मधील बांग्लादेशचं आव्हान कायम, ओमानवर 26 धावांनी विजय

T20 World Cup 2021: स्कॉटलंडच्या खेळाडूने भारतात घेतली स्पेशल ट्रेनिंग, विश्वचषकात रचला इतिहास

T20 World Cup मध्ये स्कॉटलंडच्या खेळासह जर्सीही फॅन्सना आवडली, 12 वर्षांची चिमुरडी आहे डिझायनर

(T20 World Cup : Hardik Pandya is game changer, whether he’s got bat or ball in his hand : Dale Steyn)

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.