
सिडनी: टी 20 वर्ल्ड कपच्या एका महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानने डकवर्थ लुईस नियमाने दक्षिण आफ्रिकेवर 33 रन्सनी विजय मिळवला. पाकिस्तानच्या सेमीफायनल प्रवेशाची शक्यता अजूनही कायम आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ही मॅच झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना 14 ओव्हर्सचा खेळवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 14 ओव्हर्समध्ये 142 धावांच टार्गेट मिळालं होतं. पण दक्षिण आफ्रिकेच्या टीमने 9 विकेट गमावून 108 धावा केल्या.
समीकरण कसं बदलू शकत ते समजून घ्या….
पाकिस्तानच्या दक्षिण आफ्रिकेवरील विजयामुळे ग्रुप 2 मध्ये समीकरण थोडं गुंतागुंतीच झालय. दक्षिण आफ्रिकेला आता पुढचा नेदरलँड्स विरुद्धचा सामना जिंकावाच लागेल. अन्यथा वर्ल्ड कपमधील त्यांच आव्हान संपुष्टात येईल. नेदरलँडस विरुद्ध विजयाने त्यांचे 7 पॉइंटस होतील. दक्षिण आफ्रिकेची टीम सेमीफायनलसाठी क्वालिफाय करेल. दक्षिण आफ्रिकेने आपला शेवटचा सामना हरला आणि पाकिस्तानने बांग्लादेशवर विजय मिळवला, तर पाक टीम 6 पॉइंटसह दुसऱ्या पोजिशनवर राहून क्वालिफाय करेल.
आता भारताला जिंकावच लागेल
पाकिस्तानच्या विजयानंतर आता टीम इंडियाला झिम्बाब्वे विरुद्ध जिंकावच लागेल. सध्याचा फॉर्म लक्षात घेता टीम इंडियाला झिम्बाब्वेला हरवण्यात फार अडचण येईल, असं वाटत नाही. 6 नोव्हेंबरला भारत-झिम्बाब्वे सामना पावसामुळे रद्द झाला, तरी टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचेल. कारण 1 पॉइंटसह टीम इंडियाचे सात पॉइंट होतील.
| टीम | सामने | विजय | पराजय | रनरेट | पॉइंट्स |
|---|---|---|---|---|---|
| भारत | 4 | 3 | 1 | +0.730 | 6 |
| पाकिस्तान | 5 | 3 | 2 | +1.028 | 6 |
| दक्षिण आफ्रिका | 5 | 2 | 2 | +0.874 | 5 |
| नेदरलँड्स | 5 | 2 | 3 | -0.849 | 4 |
| बांग्लादेश | 5 | 2 | 3 | -1.176 | 4 |
| झिम्बाब्वे | 4 | 1 | 2 | -0.313 | 3 |
नेट रनरेटमध्ये कोण सरस?
समजा झिम्बाब्वेने भारताला हरवलं आणि दक्षिण आफ्रिका, पाकिस्तानने आपआपले शेवटचे सामने जिंकले, तर भारताच्या अडचणी वाढतील. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेचे सात आणि भारत, पाकिस्तानचे समान 6 पॉइंटस होतील. भारत-पाकिस्तानमध्ये नेट रनरेटचा विषय आला, तर बाबर ब्रिगेड पुढे आहे.