IND vs ZIM T20 WC: भारतीय गोलंदाजाच्या जिगरी मित्रानेच ऋषभ पंतचा खेळ संपवला, पहा VIDEO

| Updated on: Nov 06, 2022 | 3:59 PM

IND vs ZIM T20 WC: काय कॅच पकडली राव, एकदम 1 नंबर

IND vs ZIM T20 WC: भारतीय गोलंदाजाच्या जिगरी मित्रानेच ऋषभ पंतचा खेळ संपवला, पहा VIDEO
rishabh pant-rohit sharma
Follow us on

मेलबर्न: टीम इंडियाचा आज झिम्बाब्वे विरुद्ध सामना सुरु आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच कॅप्टन रोहित शर्माने ऋषभ पंतवर विश्वास दाखवला. दिनेश कार्तिकला बाहेर बसवून ऋषभ पंतला संधी दिली. सेमीफायनलआधी ऋषभकडे आज स्वत:ला सिद्ध करण्याची संधी होती. पण ऋषभ अपयशी ठरला. त्याने फक्त 3 रन्सच केल्या. भारतीय गोलंदाज कुलदीप यादवच्या जिगरी मित्राने ऋषभचा खेळ संपवला.

अशक्य वाटणारी कॅच शक्य केली

टीम इंडियाने आज पहिली बॅटिंग केली. 14 व्या ओव्हरमध्ये ऋषभला विलियम्सच्या ओव्हरमधील तिसरा चेंडू सीमारेषेबाहेर पोचवायचा होता. गॅप शोधून त्याने जबरदस्त शॉट देखील मारला. पण इथे बर्लने अशक्य वाटणारी कॅच शक्य करुन दाखवली.

कुलदीप-बर्ल जिगरी दोस्त

लाँग ऑनवर लेफ्ट साइडला हवेत डाइव्ह मारुन बर्लने जबरदस्त कॅच घेतली. कोणालाच या कॅचवर विश्वास बसला नाही. बर्लने ही कॅच पकडून पंतला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. सोशल मीडियावर बर्लच्या या कॅचचीच चर्चा आहे. बर्ल आणि कुलदीप यादव एकमेकांचे जिगरी दोस्त आहेत. मागच्या 10 वर्षांपासून दोघे परस्परांना ओळखतात.

10 वर्षानंतर आमने-सामने आले

कुलदीप आणि बर्ल परस्पराविरोधात पहिल्यांदा अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये खेळले होते. तिथूनच दोघांच्या मैत्रीची सुरुवात झाली. काही महिन्यांपूर्वी टीम इंडिया आणि झिम्बाब्वेमध्ये वनडे सीरीज झाली. त्यावेळी 10 वर्षानंतर दोघे आमने-सामने आले होते. बर्लने कुलदीपसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेयर करुन आपल्या मैत्रीची कल्पना दिली होती.


पंतच्या आधी कोहलीची शिकार

पंतच्या आधी रियान बर्लच्या शानदार फिल्डिंगमुळे विराट कोहलीला सुद्धा पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. 12 व्या ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर विलियम्सच्या गोलंदाजीवर बर्लने कोहलीची कॅच घेतली. कोहली या मॅचमध्ये मोठी इनिंग खेळू शकला नाही. तो 26 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 2 चौकार लगावले.