Sanjana ganesan: ‘स्वत: चप्पलसारख तोंड घेऊन….’, जसप्रीत बुमराहची बायको खवळली

Sanjana ganesan: सोशल मीडियावर 'तो' युजर असं काय म्हणाला? की, ज्यामुळे संजना गणेशन इतकी खवळली

Sanjana ganesan: स्वत: चप्पलसारख तोंड घेऊन...., जसप्रीत बुमराहची बायको खवळली
sanjana ganeshan
Image Credit source: instagram
| Updated on: Nov 09, 2022 | 1:05 PM

सिडनी: सोशल मीडियावर अनेकदा क्रिकेटपटूंना ट्रोल केलं जातं. काहीवेळा खेळामुळे तर काही वेळा वक्तव्यामुळे खेळाडू ट्रोल होतात. काहीवेळा खेळाडूच्या पार्टनरला सुद्धा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अलीकडेच टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची बायको संजना गणेशनला ट्रोल करण्याचा प्रयत्न झाला. संजना गणेशनने त्या ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं.

खालच्या दर्जाची कमेंट

जसप्रीत बुमराहची बायको सध्या ऑस्ट्रेलियात आहे. सध्या ती आयसीसीकडून टी 20 वर्ल्ड कप कव्हर करतेय. संजना गणेशन वर्ल्ड कपच कव्हरेज करताना सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करत असते. एडिलेड स्टेडियममधून तिने एक फोटो पोस्ट केला होता. त्यावर एका युजरने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्याने खूप खालच्या दर्जाची कमेंट केली.

असं उत्तर दिलं की, यापुढे कोणी….

ट्रोलरने संजनाच्या फोटोवर कमेंट केली. ‘मॅम तुम्ही इतक्या सुंदरही नाहीत. तुम्ही जसप्रीत बुमराहला कसं पटवलं?’ त्यावर संजनाने या कमेंटवर उत्तर द्यायचा निर्णय घेतला. संजनाने असं उत्तर दिलं की, यापुढे कोणी संजनाच्या वाट्यला जायचा विचार करणार नाही.

या रागाचा लगेच परिणाम दिसला

स्वत: चप्पल सारखं तोंड घेऊन फिरतोयस, त्याचं काय? या शब्दात संजनाने ट्रोलरला झापलं. संजनाच्या या रागाचा लगेच परिणाम दिसून आला. त्या ट्रोलरने आपली कमेंट डिलीट केली आणि स्वत:च अकाऊंट प्रायव्हेट केलं. संजनाने त्यानंतर इन्स्टाग्राम स्टोरीवर याबद्दल माहिती दिली.

संजनाने योग्य मुद्दा मांडला

“आज मी एका ट्रोलरला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं, तेव्हा त्याने आपली कमेंट डिलीट केली व माझी कमेंट रिपोर्ट केली. जर तुम्ही एक निगेटिव्ह कमेंट पचवू शकत नाही. तर मी अशा हजारो कमेंटसकडे दुर्लक्ष करावं, अशी तुम्ही अपेक्षा कशी करु शकता. हा दुटप्पीपणा आहे. सोशल मीडियावर काही बोलण्याआधी विचार करा” असं संजनाने लिहीलं आहे.

संजना गणेशन एक लोकप्रिय टीव्ही प्रेजेंटर आणि मॉडेल आहे. ती मॅचआधी अँकरिंग करते. 2021 मध्ये संजना आणि जसप्रीत बुमराहने लग्न केलं. बुमराह दुखापतीमुळे यावेळी टी 20 वर्ल्ड कप टीमचा भाग नाहीय.