AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OTT वर अचानक ट्रेंडमध्ये आला 11 वर्षे जुना चित्रपट, बोल्ड अभिनेत्रीने साकारली भूमिका, कुटुंबासोबत पाहू शकता

ओटीटीवर अचानक ट्रेंडमध्ये आला 11 वर्षे जुना चित्रपट. ज्यामध्ये बोल्ड लुकमुळे चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रीने साकारली आहे भूमिका.

OTT वर अचानक ट्रेंडमध्ये आला 11 वर्षे जुना चित्रपट, बोल्ड अभिनेत्रीने साकारली भूमिका, कुटुंबासोबत पाहू शकता
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 16, 2026 | 8:50 AM
Share

Bollywood Movies : ओटीटीच्या दुनियेत दर आठवड्याला मोठ्या बजेटचे नवे चित्रपट प्रदर्शित होत असले तरी काही जुने चित्रपट त्यांच्या साधेपणामुळे आणि हृदयाला भिडणाऱ्या कथेमुळे पुन्हा ट्रेंडिंगमध्ये झळकताना दिसत आहेत. सध्या नेटफ्लिक्सवर Dum Laga Ke Haisha हा 2015 मधील गाजलेला रोमँटिक-कॉमेडी चित्रपट ‘टॉप 10’ यादीत स्थान मिळवत पुन्हा चर्चेत आला आहे. आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रभावी अभिनयामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात पुन्हा घर करत आहे.

चित्रपटाची कथा 90 च्या दशकातील हरिद्वारच्या गल्ल्यांमध्ये नेते. प्रेम प्रकाश तिवारी हा तरुण आपल्या वडिलांच्या कॅसेट दुकानात काम करतो आणि तो गायक कुमार सानू यांचा मोठा चाहता असतो. पारंपरिक कुटुंबात वाढलेला प्रेम स्वतःच्या आयुष्याबद्दल काही वेगळी स्वप्ने पाहत असतो. मात्र घरच्यांच्या आग्रहामुळे त्याचे लग्न संध्या (भूमी पेडणेकर) हिच्याशी होते.

प्रेमला आपल्या पत्नीबद्दल वेगळ्या अपेक्षा असतात पण संध्या थोडी जाड असल्याने तो तिला स्वीकारू शकत नाही. तो तिच्याकडे कमीपणाने पाहतो. तिचा अपमान करतो. दुसरीकडे, संध्या ही शिक्षित आणि स्वाभिमानी मुलगी असून तिला शिक्षिका बनण्याचे स्वप्न असते. ती संसार वाचवण्यासाठी प्रयत्न करते पण प्रेमच्या वागणुकीमुळे तिच्या आत्मसन्मानाला धक्का बसतो.

एका कानशिलात घेते वेगळं वळण

कथेतील महत्त्वाचा टप्पा तेव्हा येतो जेव्हा एका कार्यक्रमात प्रेम सर्वांसमोर संध्याचा अपमान करतो. आतापर्यंत शांत असलेली संध्या संतापून प्रेमच्या कानशिलात लगावते. या घटनेनंतर दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि घटस्फोटाची वेळ येते.

मात्र, एका आगळ्यावेगळ्या स्पर्धेमुळे ज्यात प्रेमला संध्याला खांद्यावर उचलून धावावे लागते. दोघांच्या नात्यात बदलाची सुरुवात होते. द्वेष आणि अहंकार याऐवजी समजूतदारपणा आणि प्रेम जागा घेऊ शकते का, हे जाणून घेण्यासाठी ही सुमारे 1 तास 50 मिनिटांचा चित्रपट तुम्हाला बघावा लागेल.

साधेपणात दडलेली ताकद

‘दम लगा के हईशा’ हा चित्रपट शरीरयष्टी, आत्मसन्मान, कुटुंबीय अपेक्षा आणि खऱ्या प्रेमाचा अर्थ यांसारख्या विषयांना हलक्या-फुलक्या पण परिणामकारक पद्धतीने हाताळतो. त्यामुळेच प्रदर्शित होऊन दशक उलटूनही हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ओटीटीवर नव्या चित्रपटांच्या गर्दीतही ही साधी, प्रामाणिक आणि हृदयस्पर्शी कथा पुन्हा एकदा प्रेक्षकांना भावत असल्याचे चित्र दिसत आहे.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर