क्या बात है रोहित भाऊ… आऊट झाला, पण रेकॉर्ड केला

| Updated on: Sep 20, 2022 | 9:34 PM

रोहितनं नऊ चेंडूंच्या खेळीत 11 धावा केल्या आणि आऊट झाला. पण, आऊट होण्यापूर्वी रोहित शर्मानं T20I क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम केलाय. तो कोणता विक्रम आहे. याविषयी जाणून घ्याी...

क्या बात है रोहित भाऊ... आऊट झाला, पण रेकॉर्ड केला
रोहित शर्मा
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली :  मोहालीत सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (IND vs AUS) तीन सामन्यांच्या टी-20 सीरिजमधील पहिल्या सामन्यात विराट (Virat Kohli) आणि रोहितनं (Rohit Sharma) आऊट होऊन टीम इंडियाला धक्का दिलाय. मात्र, यात रोहित आऊट झाला असला तरी एक मोठा रेकॉर्ड बनवला आहे. रोहितनं नऊ चेंडूंच्या खेळीत 11 धावा केल्या आहेत. यात त्यानं एक चौकार आणि एक षटकार मारला आहे. आऊट होण्यापूर्वी रोहित शर्मानं T20I क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम केलाय. रोहित आता T20I क्रिकेटमध्ये संयुक्त सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे.

172 षटकार

रोहितनं मार्टिन गप्टिलसारखाच T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला. मार्टिन गप्टिलच्या नावावर T20I क्रिकेटमध्ये 172 षटकार आहेत. आता रोहितच्या नावावरही 172 षटकार झाले आहेत.

हेही वाचा….

रोहितनं T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 137 सामने खेळले आहेत. यात त्यानं 4 शतके आणि 28 अर्धशतके केली आहे. त्याचवेळी त्याने 32.13 च्या सरासरीने 3631 धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राइक रेट 140.57 आहे. रोहितची सर्वोत्तम धावसंख्या 119 धावा असून त्याच्या नावावर एकूण 324 चौकारांची नोंद आहे.

आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज  कोण आहेत. याविषयी जाणून घ्या….

  1. मार्टिन गुप्टिल – 121 सामने – 172 षटकार
  2. रोहित शर्मा – 137 सामने – 172 षटकार
  3. ख्रिस गेल – 79 सामने – 124 षटकार
  4. इओम मॉर्गन – 115 सामने – 120 षटकार
  5. आरोन फिंच – 93 सामने – 117 षटकार
  6. रोहित शर्माची T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

137 टी-20 सामन्यात 3631 धावा

रोहितनं 137 टी-20 सामन्यात 3631 धावा केल्या आहेत. यामध्ये 28 अर्धशतके आणि चार शतकांचा समावेश आहे. गुप्टिलने 121 टी-20 सामन्यांमध्ये 3497 धावा केल्या आहेत.