AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ind vs eng semi final : कोहलीचा प्लॉप शो, द्रविड थेट विराटजवळ गेला अन्… Video तुफान व्हायरल

ind vs eng semi final update : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील सामन्यात विराट कोहली लवकर आऊट झाला. चाहत्यांची आजही निराशा झाली, अशातच कोहली आणि द्रविडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ind vs eng semi final : कोहलीचा प्लॉप शो, द्रविड थेट विराटजवळ गेला अन्... Video तुफान व्हायरल
| Updated on: Jun 27, 2024 | 11:16 PM
Share

टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये दुसरा सेमी फायनल सामना सुरू आहे. हा सामना गयानामध्ये असून इंग्लंड संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाची सुरूवात एकदम खराब झाल्याचं पाहायला मिळालं. टीम इंडियाचा दोन बडे खेळाडी स्वस्तात परतले. त्यामुळे आता टीम इंडियावर दबाव असून इंग्लंड संघ एक पाऊल पुढे आहे. संपर्ण स्पर्धेत विराट कोहली अपयशी ठरलाय. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये त्याच्याकडून अपेक्षा होत्या. मात्र विराट कोहली परत एकदा लवकर आऊट झाला. कोहलीसुद्धा नाराज झाला होता, कोहली डगआऊटमध्ये बसल्यावर त्याच्याकडे हेड कोच राहुल द्रविड गेल्याचं पाहायला मिळालं.

विराट कोहलीने 9  बॉलमध्ये 9 धावा केल्या, यामध्ये त्याने एक खणखणीत षटकार मारला.  पण त्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादात तो बोल्ड आऊट झाला.  रीस टोपलेने कोहलीला आऊट करत टीम इंडियाला पहिला धक्का दिला. कोहली शांत दिसत असला तरीपण त्याच्यावर किती दबाव असेल हे काही सांगण्याची गरज नाही. एकटा मैदानात थांबून विरोधकांना रडवणारा कोहली धावा करताना संघर्ष करताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ:-

आजच्या सेमी फायनलमध्ये कोहली खेळणार असं सर्वांना वाटत होतं. कोहलीने सुरूवातही केली होती पण आजही तो यशस्वी झाला नाही. कोहली डगआऊटमध्ये बसलेला, त्याच्यासोबत रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह बसलेले दिसले. त्यावेळी टीमचे मुख्य कोच राहुल द्रविड यांनी त्याच्याजवळ जात त्याचा आत्मविश्वास वाढवला. टीमचा कोच जवळ येत आपल्या पाठिमागे उभा राहत असेल तर खेळाडूवरचा दबाव हा नक्कीच कमी होतो.  जगातील दिग्गज खेळाडूंमध्ये कोहलीचा समावेश होतो त्यामुळे त्याला स्वत:लाही वाईट वाटत असणार यात काही शंक नाही.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपले.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....