
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची सुरुवात टीम इंडियाने विजयाने केली. पहिल्या सामन्यात भारताने अमेरिकेचा 29 धावांनी धुव्वा उडवला. खऱं तर भारतीय फलंदाजी या सामन्यात विखुरली होती. तरी एका बाजूने कर्णधार सूर्यकुमार यादवने खिंड लढवली आणि विजय मिळवून दिला. या विजयाचं खरं श्रेय हे कर्णधार सूर्यकुमार यादवला जातं. कारण या खेळपट्टीवर धावा करणं खरंच कठीण होतं. भारताचे दिग्गज फलंदाज या खेळपट्टीवर तग धरू शकले नाही. आता भारताचा पुढचा सामना नामिबियाशी होणार आहे. हा सामना 12 फेब्रुवारीला होणार आहे.
टीम इंडियाची फलंदाजी फार काही चांगली राहिली नाही. तरी सूर्यकुमार यादवच्या खेळीमुळे टीम इंडियाने 161 धावांवर मजल मारली होती. या धावांचा पाठलाग करताना अमेरिकेने 8 गडी गमवून 132 धावा केल्या. भारताने हा सामना 29 धावांनी जिंकला. या सामन्याचा विजयाचा शिल्पकार ठरला तो कर्णधार सूर्यकुमार यादव.. एकीकडे विकेट धडाधड पडत असताना शेवटपर्यंत उभा राहून त्याने सामना जिंकवण्यात मोलाचा हातभार लावला. त्यानंतर गोलंदाजांनी 161 धावा यशस्वीरित्या रोखल्या.
अर्शदीप सिंह याने मोहम्मद मोहसिन याला आऊट करत यूएसएला सातवा झटका दिला आहे. मोहसिनने 8 रन्स केल्या. यूएसएची 17.4 ओव्हरमध्ये 7 आऊट 110 अशी स्थिती झाली आहे. टीम इंडियाने यासह आता विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.
टीम इंडियाचा उपकर्णधार अक्षर पटेल याने यूएसएला सलग 2 बॉलमध्ये 2 झटके दिले आहेत. अक्षरने यूएसएच्या डावातील 16 व्या तर त्याच्या कोट्यातील चौथ्या ओव्हरमध्ये सलग 2 बॉलमध्ये 2 विकेट्स मिळवल्या. अक्षरने संजय कृष्णमूर्ती आणि त्यानंतर हरमीत सिंह या दोघांना आऊट केलं. संजूने 37 धावा केल्या. तर हरमीत आला तसाच झिरोवर आऊट होऊन मैदानाबाहेर गेला.
विकेटकीपर इशान किश याने चलाखपणे स्टपिंग करत यूएसएला चौथा झटका दिला आहे. इशानने मिलिंद कुमार याला स्टपिंग आऊट केलं. मिलिंदने 34 रन्स केल्या. तसेच मिलिंदने संजय कृष्णमुर्ती याच्यासह चौथ्या विकेटसाठी 58 रन्सची पार्टनरशीप केली. मात्र इशानच्या चलाखीमुळे ही सेट जोडी भारताला फोडण्यात यश आलं.
मिलिंद कुमार आणि संजय कृष्णमूर्ती या जोडीने यूएसएचा डाव सावरला आहे. मिलिंद कुमार आणि संजय कृष्णमूर्ती या जोडीने चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतरी भागीदारी केली आहे.
भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. भारताने यूएसएला 3 झटके दिले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चिवट बॉलिंग करणं सुरु ठेवलंय. यूएसएने 162 रन्सचा पाठलाग करताना 10 ओव्हरमध्ये 49 रन्स केल्या आहेत.
भारताचा वेगवान गोलंदाज याने मॅजिक मियाँ या त्याच्या टोपण नावाला साजेशी कामगिरी करत धमाका केला आहे. मोहम्मद सिराज याने त्याच्या कोट्यातील दुसऱ्या आणि सामन्यातील चौथ्या ओव्हरमध्ये यूएसएला दुसरा झटका दिला आहे. सिराजने अँड्रयू गॉस याच्यानंतर साईतेजा मुक्कामल्ला याला आऊट केलं. साईतेजाने 2 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
भारतीय गोलंदाजांनी 162 धावांचा पाठलाग करणाऱ्या यूएसएला झटपट 2 झटके देत कडक कामिगरी केली आहे. मोहम्मद सिराज याने दुसऱ्या ओव्हरमध्ये अँड्रयू गॉस याला आऊट केलं. भारताने अशाप्रकारे यूएसएला पहिला झटका दिला. त्यानंतर अर्शदीपने त्याच्या पहिल्या आणि यूएसएच्या डावातील तिसऱ्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर धमाका केला. अर्शदीपने यूएसएचा कर्णधार मोनांक पटेल याला झिरोवर शिवम दुबे याच्या हाती कॅच आऊट केलं.
यूएसएच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. यूएसएकडून अँड्रयू गॉस आणि मुक्कामल्ला ही सलामी जोडी मैदानात आली आहे. टीम इंडिुयाने यूएसएसमोर 162 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
कॅप्टन सूर्यकुमार यादव याने केलेल्या चिवट आणि झुंजार खेळीच्या जोरावर भारताने 160 पार मजल मारली. टीम इंडियाने वानखेडेत 9 विकेट्स गमावून 161 धावा केल्या. भारताला इथवर पोहचवण्यात सूर्याने सर्वाधिक योगदान दिलं. सूर्याने 84 धावांची नाबाद खेळी केली. अशाप्रकारे भारताने यूएसएसमोर 162 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता सूर्यासेना यूएसएला विजयी आव्हान गाठण्यापासून रोखणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कॅप्टन सूर्यकुमार यादव याने डावातील शेवटच्या अर्थात 20 व्या ओव्हरमध्ये फटकेबाजी केली. सूर्याने सौरभ नेत्रवाळकरच्या बॉलिंगवर मोठे फटके मारले. सूर्याने 2 चौकार, 2 षटकार आणि 1 एकेरी धावेसह एकूण 21 धावा लुटल्या.
कर्णधार सूर्यकुमार यादव याने त्याच्या घरच्या मैदानात 37 चेंडूत 7 चौकार आणि 1 सिक्ससह अर्धशतक झळकावलं आहे. सूर्याने अतिशय बिकट स्थितीत चिवट झुंज देत हे अर्धशतक झळकावलं.
यूएसएने टीम इंडियाला सातवा झटका दिला आहे. हरमीत सिंह याने अक्षर पटेल याला मोहसिन याच्या हाती कॅच आऊट केलं. अक्षरने 11 बॉलमध्ये 14 रन्स केल्या.
टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने 16 व्या ओव्हरमध्ये मोठे फटके मारले. सूर्याच्या या फटकेबाजीमुळे भारताला एका ओव्हरमध्ये 20 पेक्षा अधिक धावा मिळाल्या. भारताने या ओव्हरमध्ये एकूण 21 धावा केल्या.
हरमीत सिंह याने ऑलराउंडर हार्दिक पंड्या याला आऊट करत टीम इंडियाला सहावा झटका दिला आहे. हार्दिकने 6 बॉलमध्ये 5 रन्स केल्या. हार्दिक आऊट झाल्याने भारताची12.4 ओव्हरमध्ये 6 आऊट 77 अशी स्थिती झाली आहे.
यूएसएने 4 झटके देऊन टीम इंडियाला बॅकफुटवर ढकललं होतं. त्यानंतर कॅप्टन सूर्या आणि रिंकू या दोघांनी काही ओव्हर टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांमध्ये भागीदारी साकार होत होती. अशातच यूएसएने रिंकू सिंह याला आऊट करत भारताला पाचवा झटका दिला. रिंकू 6 रन्स करुन आऊट झाला.
यूएसएने टॉप ऑर्डरला झटपट ढेर करत टीम इंडियाला बॅकफुटवर ढकललं. शॅडली व्हॅन शाल्कविक याने एकाच ओव्हरमध्ये 3 झटके दिले. त्यामुळे टीम इंडियाची 6 ओव्हरमध्ये 4 आऊट 46 अशी झाली. मात्र त्यानंतर कॅप्टन सूर्या आणि रिंकू या दोघांनी 10 ओव्हरपर्यंत टीम इंडियाला 63 रन्सपर्यंत पोहचवलं आहे. टीम इंडियाला या अडचणीतून बाहेर काढायचं असेल तर रिंकू-सूर्या या जोडीला मोठी भागीदारी करावी लागेल. त्यामुळे या जोडीकडून भारताला अनेक आशा आहेत.
यूएसएचा वेगवान गोलंदाज शॅडली व्हॅन शाल्कविक याने कहर केला आहे. यूएसएने टीम इंडियाला एकाच ओव्हरमध्ये तब्बल 3 झटके देत बॅकफुटवर टाकलं आहे. शॅडली व्हॅन शाल्कविक याने सहाव्या ओव्हरमध्ये इशान किशन, तिलक वर्मा आणि शिवम दुबे या तिघांना आऊट केलं. शिवम दुबे याला तर भोपळाही फोडता आला नाही. शिवम दुबे गोल्डन डक ठरला. इशानने 20 तर तिलकने 25 धावा केल्या.
अभिषेक शर्मा झिरोवर आऊट झाल्यानंतर तिलक वर्मा याने मैदानात येताच जोरदार फटकेबाजीला सुरुवात केली. तिलकने इशानसोबत टीम इंडियाचा स्कोअरकार्ड धावता ठेवला. भारताने अशाप्रकारे 5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 44 धावा केल्या आहेत. तिलक 24 आणि इशान 20 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे.
यूएसएने टीम इंडियाला पहिलाच आणि मोठा झटका दिला आहे. अली खान याने सामन्यातील दुसऱ्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर अभिषेक शर्मा याला आऊट केलं आहे. अभिषेक शर्मा अशाप्रकारे टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील डेब्यूत झिरोवर आऊट झाला. अभिषेक गोल्डन डक आऊट झाला.
टीम इंडिया विरुद्ध यूएसए सामन्याला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाकडून इशान किशन आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली आहे. यूएसएने या सामन्यात टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. भारताची सलामी जोडी कशी सुरुवात मिळवून देते याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
यूएसए प्लेइंग ईलेव्हन : अँड्रिज गॉस (विकेटकीपर), सैतेजा मुक्कामल्ला, मोनांक पटेल (कर्णधार), मिलिंद कुमार, संजय कृष्णमूर्ती, शुभम रांजणे, हरमीत सिंग, मोहम्मद मोहसीन, शेडली व्हॅन शाल्क्विक, अली खान आणि सौरभ नेत्रावळकर.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : इशान किशन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि वरुण चक्रवर्ती
यूएसएने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकला आहे. यूएसएचा कर्णधार मोनांक पटेल याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता टीम इंडिया वानखेडे स्टेडियममध्ये किती धावांचा डोंगर उभारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-यूएसए सामन्याआधी ओपनिंग सेरेमनीला सुरुवात झाली आहे. सतारवादक ऋषभ शर्मा आणि सिवामनी या दोघांनी आपल्या कलाकारीने स्टेडियममधील चाहत्यांना मंत्रमुग्घ केलं आहे.
टीम इंडिया विरुद्ध यूएसए यांच्यात आतापर्यंत एकमेव सामना खेळवण्यात आला आहे. हा सामना गेल्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळवण्यात आला होता. भारताने तेव्हा रोहित शर्मा याच्या नेतृत्वात यूएसएचा 7 विकेट्सने पराभव केला होता.
टीम इंडिया विरुद्ध यूएसए सामन्याला संध्यकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर थोड्याच वेळात 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. त्याआधी चाहत्यांनी वानखेडे स्टेडियम फुल्ल झालं आहे. चाहत्यांना सामना सुरु होण्याची प्रतिक्षा आहे.
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडिया : इशान किशन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन आणि वॉशिंग्टन सुंदर.
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध यूएसए आमनेसामने आहेत. या सामन्याआधी संध्याकाळी 6 वाजता ओपनिंग सेरेमनीला सुरुवात होणार आहे. या ओपनिंग सेरेमनीत सतारवादक ऋषभ शर्मा आपली कलाकारी दाखवणार आहे. सिवामनी परफॉर्मन्स करणार आहे. प्रसिद्ध गायक बादशाह गाणार आहे. तर डान्सर नोरा फतेही हीच्या परफॉरमन्सची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे. आयसीसीने याबाबतची माहिती दिली आहे.
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध यूएसए आमनेसामने आहेत. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. तर त्याआधी रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.