T20 World cup: दक्षिण आफ्रिकेवरील विजयानंतरही पाकिस्तानी टीमला धक्का, बाबर आजमकडून प्रार्थना

T20 World cup: एक महत्त्वपूर्ण सामना पाकिस्तानने जिंकला, पण....

T20 World cup: दक्षिण आफ्रिकेवरील विजयानंतरही पाकिस्तानी टीमला धक्का, बाबर आजमकडून प्रार्थना
Babar Azam
| Updated on: Nov 03, 2022 | 7:29 PM

सिडनी: पाकिस्तानने टी 20 वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी एक महत्त्वपूर्ण सामना जिंकला. टुर्नामेंटच्या चौथ्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला हरवलं. पाकिस्तानने या विजयासह सेमीफायनलच्या अपेक्षा कायम ठेवल्या आहेत. सिडनीच्या मैदानात पाकिस्तान वि दक्षिण आफ्रिका सामना सुरु असताना मैदानाबाहेर एक धक्कादायक घटना घडली.

पाकिस्तानी टीमलाही झटका बसला

मैदानाबाहेरच्या या घटनेमुळे पाकिस्तानी टीमलाही झटका बसला आहे. टीम मॅच खेळून बाहेर आल्यानंतर त्यांना माजी कर्णधार आणि देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याच समजलं. सर्वच खेळाडूंनी इम्रान खान यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.

पंजाब प्रांतामध्ये हल्ला

इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालीच पाकिस्तानने क्रिकेटमध्ये पहिला वर्ल्ड कप जिंकला. क्रिकेटनंतर इम्रान खान यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. गुरुवारी त्यांनी सत्ताधारी राजवटी विरोधात मार्च काढला होता. त्यावेळी पंजाब प्रांतामध्ये त्यांच्या कंटेनर-ट्रकवर हल्ला झाला. इम्रान खान यांच्या पायाला गोळी लागलीय. इम्रान यांच्या प्रकृतीला धोका नाहीय.


खेळाडूंनी प्रार्थना केलीय

एका अज्ज्ञात हल्लेखोराने पंजाबच्या वजीराबादमध्ये अल्लाहवाला चौकात गोळीबार केला. पाकिस्तानी टीमला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी हल्ल्याचा निषेध केला. इम्रान खान यांच्या प्रकृतीला आराम पडावा ते लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी खेळाडूंनी प्रार्थना केलीय.