AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs SL Final : श्रीलंका फायनलसाठी सज्ज, पाकिस्तान विरुद्ध भिडणार, कोण ठरणार चॅम्पियन?

Pakistan vs Sri Lanka Final Preview : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात 29 नोव्हेंबरला टी 20i ट्राय सीरिज ट्रॉफीसाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? जाणून घ्या.

PAK vs SL  Final : श्रीलंका फायनलसाठी सज्ज, पाकिस्तान विरुद्ध भिडणार, कोण ठरणार चॅम्पियन?
PAK vs SLImage Credit source: Surjeet Yadav/MB Media/Getty Images
| Updated on: Nov 28, 2025 | 11:18 PM
Share

यजमान पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात पाकिस्तान टी 20i त्रिकोणी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेत 5 सामन्यांनंतर अंतिम फेरीसाठी 2 संघ निश्चित झाले. साखळी फेरीत प्रत्येक संघाला 4 सामने खेळण्याची संधी मिळाली. पाकिस्तानने सलग 3 सामने जिंकत अंतिम फेरीत धडक दिली. तर श्रीलंकेने 27 नोव्हेंबरला पाकिस्तानला पराभूत केलं. श्रीलंकेने यासह फायनलचं तिकीट मिळवलं. पाकिस्तानने हा सामना जिंकला असता तर झिंबाब्वेला अंतिम फेरीचं तिकीट मिळालं असतं. मात्र श्रीलंकेने पाकिस्तानवर 6 धावांनी मात करत ट्रॉफीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं. तर श्रीलंकेच्या या विजयामुळे झिंबाब्वेचं पॅकअप झालं. आता ही ट्रॉफी कोण जिंकणार? या प्रश्नाचं उत्तर येत्या काही तासांमध्ये मिळणार आहे.

कोण जिंकणार फायनल?

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात महाअंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. सलमान आघा अंतिम सामन्यात पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर दासुन शनाका याच्याकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. हा अंतिम सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका अंतिम सामना केव्हा?

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका अंतिम सामना शनिवारी 29 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका अंतिम सामना कुठे?

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका अंतिम सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडयिममध्ये होणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका अंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका अंतिम सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 6 वाजता टॉस होईल.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका अंतिम सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका अंतिम सामना भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका अंतिम सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका अंतिम सामना मोबाईल आणि लॅपटॉपवर स्पोर्ट्स टीव्ही या युट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल.

पाकिस्तान-श्रीलंका तिसऱ्यांदा आमेनसामने

दरम्यान पाकिस्तान आणि श्रीलंकेची या मालिकेत आमनेसामने येण्याची तिसरी वेळ ठरणार आहे. याआधी झालेल्या 2 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. त्यामुळे आता अंतिम सामन्यात कोण मैदान मारणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.