ICC T20 World Cup : भारतीय संघाचं टी 20 विश्वचषकातील वेळापत्रक जाहीर, भारताचा सामना कधी कोणाशी? पाहा एका क्लिकवर

| Updated on: Aug 17, 2021 | 11:57 AM

टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. यावेळी भारतीय संघाचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तान संघाशी होणार आहे.

ICC T20 World Cup : भारतीय संघाचं टी 20 विश्वचषकातील वेळापत्रक जाहीर, भारताचा सामना कधी कोणाशी? पाहा एका क्लिकवर
भारतीय टी20 संघ
Follow us on

मुंबई : बहुप्रतिक्षित आयसीसी टी-20 विश्व विश्वचषकाचे (ICC T20 World Cup 2021) वेळापत्रक नुकतेच आयसीसीने जाहीर केले आहे. आधी भारतात खेळवण्यात येणारा टी-20 विश्वचषक कोरोनाच्या संकटामुळे 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएई आणि ओमन या देशांमध्ये खेळवला जाणार आहे. स्पर्धेतील दमदार संघापैकी एक असणाऱ्या भारतीय संघाचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत असणार आहे (India vs Pakistan). त्यामुळे या दोन्ही संघाच्या चाहत्यांसह विश्व क्रिकेट वाट पाहत असलेल्या या सामन्याची पर्वणी क्रिकेटप्रेमींना स्पर्धेच्या सुरुवातीलाच पाहायला मिळणार आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार आहे. या सर्वांच्या सामन्यांना 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. भारत सर्वात आधी पाकिस्तान सोबत 24 ऑक्टोबर रोजी भिडेल. ज्यानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड या दमदार संघामध्ये 31 ऑक्टोबरला सामना होईल. ज्यानंतरचे भारताचे सामने तितक्या ताकदवर संघाशी नसतील. 3 नोव्हेंबरला भारत  अफगाणिस्तानशी भिडेल. ज्यानंतर 5 आणि 8 नोव्हेंबर रोजी ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 आणि ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2 यांच्याशी भारताचा सामना असेल.

भारताचे टी20 विश्वचषक वेळापत्रक

टी-20 विश्वचषकात रंगणार सुपर 12 चा थरार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार 12 संघामध्ये रंगणाऱ्या विश्वचषकाच्या थरारात सुपर 12 स्टेजमध्ये  ग्रुप 1 मध्ये 6 आणि ग्रुप 2 मध्ये 6 संघ आपआपसांत भिडणार आहेत. ज्यामध्ये दोन्ही गटात प्रत्येकी 4 संघ आधीच निवडले असून इतर चार संघ हे दोन ग्रुप स्टेजेसच्या सामन्यांतून क्वॉलीफाय होऊन स्पर्धेत एन्ट्री घेणार आहेत. ग्रुप स्टेजमध्ये ग्रपु A मध्ये श्रीलंका, आयर्लंड, नाम्बिया आणि नेदरलँड हे संघ आहेत. तर ग्रुप B मध्ये बांग्लादेश, स्कॉटलँड, ओमन आणि पापुआ न्यू गिनी हे संघ आहेत.

संबंधित बातम्या 

T20 World Cup 2021 चे ग्रुप जाहीर, भारतासोबत गटात ‘हे’ संघ, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत मोठी माहिती समोर

IND vs ENG : बुमराह नडला, सिराज लॉर्ड्सवर थेट भिडला, भारताचा इंग्लंडवर थरारक विजय

(Team India all matches Schedule in ICC t20 world Cup with india vs paksitan match dates)