टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूला दुखापत! चॅम्पियन्स ट्रॉफीतून आधीच आऊट

Indian Cricket Team : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला मुकावं लागलं आहे. त्यानंतर आता आणखी एका खेळाडूला दुखापत झाल्याचं म्हटलं जात आहे.

टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूला दुखापत! चॅम्पियन्स ट्रॉफीतून आधीच आऊट
yashasvi shami rohit and jadeja team india
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 16, 2025 | 4:49 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी आता मोजून 3 दिवस बाकी आहेत. या स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेचं तब्बल 7 वर्षानंतर आयोजन करण्यात आलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा पाकिस्तानकडे आहे. मात्र टीम इंडियाचे संपूर्ण सामने हे दुबईतच होणार आहेत. टीम इंडिया या स्पर्धेसाठी दुबईत पोहचली आहे. बीसीसीआय निवड समितीने अखेरच्या क्षणी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 2 बदल केले. तर 3 खेळाडूंचा नॉन ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह म्हणून समावेश करण्यात आला आहे. मात्र आता या तिघांमधील एका खेळाडूला दुखापत झाली आहे. त्यामुळे या खेळाडूला महत्त्वाच्या सामन्याला मुकावं लागणार असल्याची शक्यता आहे.

टीम इंडियाचा प्रमुख आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर व्हावं लागलं. बीसीसीआयने याबाबत 11 फेब्रुवारीला माहिती देत बदली खेळाडूचं नावही जाहीर केलं. बीसीसीआयने एकूण 2 बदल केले. बुमराहच्या जागी हर्षित राणा याचा समावेश केला. तर यशस्वी जयस्वाल याला मुख्य संघातून डच्चू देत मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याचा समावेश केला. आता नॉन ट्रॅव्हलिंग रिझर्व्हमध्ये असलेल्या यशस्वीला दुखापत झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे यशस्वीला रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईकडून विदर्भविरुद्ध उपांत्य फेरीतील सामन्याला मुकावं लागणार असल्याचं म्हटलं जातंय.

मिडिया रिपोर्ट्सनुसार, यशस्वीने त्याला डाव्या घोट्यात वेदना होत असल्याचं टीम मॅनेजमेंटला सांगितलं. त्यामुळे यशस्वीला या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्यालाही मुकावं लागू शकतं. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मुंबई विरुद्ध विदर्भ यांच्यातील उपांत्य फेरीतील सामना हा 17 फेब्रुवारीपासून नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

यशस्वी दुखापतीमुळे उपांत्य फेरीला मुकणार!

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.