AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : नागपुरात पुन्हा एकदा सामना, हार्दिक आणि सूर्यकुमार खेळणार, सामना केव्हा?

Nagpur : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हा नागपुरातील व्हीसीए स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. त्यानंतर आता आणखी एक सामना खेळवण्यात येणार आहे. जाणून घ्या.

Cricket : नागपुरात पुन्हा एकदा सामना, हार्दिक आणि सूर्यकुमार खेळणार, सामना केव्हा?
VCA Stadium Nagpur suryakumar yadav and shivam dube
| Updated on: Feb 16, 2025 | 3:36 PM
Share

टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेआधी झालेल्या पूर्व परीक्षेत यशस्वी ठरली. टीम इंडियाने मायदेशात इंग्लंडविरुद्ध झालेल्या 3 सामन्यांची मालिका 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. टीम इंडियाने तिन्ही सामन्यात सरस कामगिरी केली आहे. उभयसंघातील या मालिकेला 6 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 6 फेब्रुवारीला इंग्लंडचा धुव्वा उडवत एकदिवसीय मालिकेत विजयी सलामी दिली. उभयसंघातील हा सामना नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा एकदा याच स्टेडियममध्ये आणखी एक सामना खेळवण्यात येणार आहे.

सध्या रणजी ट्रॉफी 2024-2025 स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दुसरा सामना हा 17 फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे व्हीसीए स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. अंतिम फेरीसाठी मुंबई विरुद्ध यजमान विदर्भ आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. अजिंक्य रहाणे हा मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर अक्षय वाडकर याच्याकडे विदर्भाची धुरा आहे.

गुजरात विरुद्ध केरळ आमनेसामने

दरम्यान उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात गुजरात विरुद्ध केरळ आमनेसामने असणार आहे. हा सामना 17 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे. सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

विदर्भविरुद्धच्या उपांत्य फेरीसाठी मुंबई संघ : अजिंक्य रहाणे (कॅप्टन), आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, अमोघ भटकल, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद (विकेटकीपर), हार्दिक तामोरे (विकेटकीपर), सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकुर, शम्स मुलानी, तनुष कोटीयन, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूजा, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर आणि हर्ष तन्ना.

उपांत्य फेरीसाठी विदर्भ टीम : अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, अमन मोखड़े, यश राठौड़, हर्ष दुबे, अक्षय कर्णेवार, यश कदम, अक्षय वखारे, आदित्य ठाकरे, दर्शन नालकंडे, नचिकेत भूते, सिद्धेश वाथ (विकेटकीपर), यश ठाकुर, दानिश मालेवार, पार्थ रेखाडे, करुण नायर आणि ध्रुव शौरी.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.