
टीम इंडियाने श्रीलंके विरुद्धची टी 20I मालिका सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 3-0 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर आता टीम इंडिया एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी टी 20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं कमबॅक होणार आहे. रोहित विराट या दोघांनी वर्ल्ड कप विजयानंतर टी 20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर आता रोहित-विराट ही जोडी महिन्याभरानंतर मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. उभयसंघातील एकदिवसीय मालिकेला 2 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.
चरित असलंका या मालिकेत श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. तर रोहित शर्मा याच्याकडे भारतीय संघांच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. रोहित-विराट व्यतिरिक्त मालिकेतून अनेक अनुभवी खेळाडू कमबॅक करत आहेत. यामध्ये श्रेयस अय्यर, कुलदीप यादव आणि केएल राहुल याचा समावेश आहे. तसेच काही अपवाद वगळता श्रीलंके विरुद्धच्या टी 20 मालिकेतील युवा खेळाडूंना एकदिवसीय मालिकेत स्थान देण्यात आलेलं नाही.
Inching closer to ODI 1⃣ ⌛️#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/XqQsU6AbEa
— BCCI (@BCCI) July 31, 2024
दरम्यान टीम इंडियाच्या खेळाडूंनी गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनात नेट्समध्ये जोरदार सराव केला आहे. बीसीसाआयने सोशल मीडियावर सरावाचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि टीम इंडियाचे इतर खेळाडूही दिसत आहेत.
पहिला सामना, 2 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता
दुसरा सामना, 4 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता
तिसरा सामना, 7 ऑगस्ट, दुपारी अडीच वाजता
वनडे सीरिजसाठी श्रीलंका टीम : चरित असलंका (कॅप्टन), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, कामिंदु मेंडिस, जेनिथ लियानगे, निशान मदुश्का, वानिंदु हसरंगा, डुनिथ वेल्लालगे, चमिका करुणारत्ने, महीश तीक्षणा, अकिला धनंजय, दिलशान मदुशंका, मथीशा पथिराना आणि असिथा फर्नांडो.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.