रोहित शर्माचा ICC ODI Rankings मध्ये जलवा, पुन्हा कारकीर्दीतील सर्वोत्तम स्थानी

Icc Odi Ranking Rohit Sharma: रोहित शर्मा याने नुकत्याच श्रीलंके विरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेतील 3 सामन्यांमध्ये 157 धावा केल्या होत्या. रोहितला याचाचा तगडा फायदा झाला आहे.

रोहित शर्माचा ICC ODI Rankings मध्ये जलवा, पुन्हा कारकीर्दीतील सर्वोत्तम स्थानी
rohit sharma team india odi
Image Credit source: bcci
| Updated on: Aug 14, 2024 | 4:51 PM

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने आयसीसी वनडे रँकिंगमध्ये धमाका केला आहे. रोहितने वनडे रँकिंगमध्ये दुसऱ्यांदा आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळवलं आहे. रोहितने टीम इंडियाचा युवा सहकारी शुबमन गिल याला मागे टाकत दुसरं स्थान पटकावलं आहे. तर पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम याने आपलं अव्वल स्थान कायम राखण्यात यश मिळवलं आहे. रोहितला नुकत्याच श्रीलंके विरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेतील कामगिरीचा फायदा झाला आहे. रोहित शर्माला त्याच्या वनडे कारकीर्दीत एकदाही अव्वल स्थानी झेप घेता आलेली नाही. मात्र आता रोहितला येत्या काही दिवसांमध्ये नंबर 1 होण्याची संधी आहे.

रोहितने श्रीलंके विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील 3 सामन्यांमध्ये सर्वाधिक 157 धावा केल्या. त्याचाच फायदा रोहितला झाला. परिणामी रोहित शुबमनला मागे टाकत दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. तसेच श्रीलंकेच्या पाथुम निसांका यालाही फायदा झाला आहे. पाथुमने टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय मालिकेत 101 धावा केल्या. पाथुम यासह आठव्या स्थानी पोहचला. श्रीलंकेने टीम इंडियाचा या मालिकेत 2-0 अशा फरकाने पराभव केला. श्रीलंकेला यासह टीम इंडिया विरुद्ध 27 वर्षांनी एकदिवसीय द्विपक्षीय मालिका जिंकण्यात यश आलं.

ताज्या आयसीसी वनडे रँकिंगनुसार, रोहित शर्मा 765 रेटिंग पॉइंट्सह दुसऱ्या स्थानी आहे. तर बाबर आझम हा 824 पॉइंट्ससह पहिल्या स्थानी कायम आहे. विशेष बाब म्हणजे रोहितने वनडे कारकीर्दीत बाबरपेक्षा अधिक रेटिंग पॉइंट्सची कमाई केली. रोहितला 882 रेटिंग्स असूनही दुसऱ्या स्थानी रहावं लागलं होतं. कारण तेव्हा विराट कोहली 909 पॉइंट्ससह नंबर 1 होता. सध्या शुबमन गिल याची दुसऱ्यावरुन तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. गिलच्या खात्यात 763 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. तर विराट कोहली 746 रेटिंग्ससह चौथ्या स्थानी आहे.

रोहितची दुसऱ्या स्थानी झेप

आयसीसी आणि वनडे आणि टेस्ट रँकिंगमध्ये टीम इंडियाकडून रोहित शर्मा हा नंबर 1 बॅट्समन आहे.रोहित कसोटी क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने गेल्या काही वर्षांमध्ये आक्रमक आणि निर्भीड अंदाजात खेळतोय. रोहितने विकेटची पर्वा न करता फटकेबाजी करुन टीम इंडियाला शानदार सुरुवात करुन दिली आहे. तर विराटने मिडल ऑर्डरची जबाबदारी सार्थपणे पार पाडली आहे.