Deepti Sharma : दीप्ती शर्माच्या निशाण्यावर आता झुलन गोस्वामीचा मोठा विक्रम, किती विकेट्सची गरज?

Most International Wickets Record In Womens Cricket : दीप्ती शर्माच्या निशाण्यावर आता झुलन गोस्वामीचा मोठा विक्रम आहे. दीप्तीला किती विकेट्सची गरज आहे? हे जाणून घऊयात.

Deepti Sharma : दीप्ती शर्माच्या निशाण्यावर आता झुलन गोस्वामीचा मोठा विक्रम, किती विकेट्सची गरज?
Shafali Verma and DeeptI Sharma Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 16, 2026 | 5:55 AM

टीम इंडियाची अनुभवी फिरकीपटू दीप्ती शर्मा हीने आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात धमाका केला. दीप्तीने 14 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या. दीप्तीने या 5 विकेट्स घेत भारताच्या विजयात प्रमुख योगदान दिलं. दीप्तीने या 5 विकेट्स घेण्यासह मोठा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. दीप्तीने टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्यानंतर आता दीप्तीच्या निशाण्यावर आणखी 1 वर्ल्ड रेकॉर्ड आहे. दीप्तीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा भारताची माजी गोलंदाज छकडा एक्सप्रेस अर्थात झुलन गोस्वामी हीच्या नावावर आहे. दीप्तीला आता झुलनच्या नावावर असणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी किती विकेट्सची गरज आहे? हे जाणून घेऊयात.

झुलनच्या नावावर किती विकेट्स?

झुलनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 355 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यानंतर दीप्ती शर्मा 354 विकेट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे दीप्तीला झुलनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी फक्त 2 विकेट्सची गरज आहे. दीप्ती पुढच्याच सामन्यात हा विक्रम आपल्या नावावर करु शकते. टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील आपला दुसरा सामना हा नेदरलँड्स विरुद्ध खेळणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या 5 महिला गोलंदाज

झुलन गोस्वामी : 355 विकेट्स

दीप्ती शर्मा : 354 विकेट्स

कॅथरीन सायव्हर ब्रँट : 335 विकेट्स

एलिसा पेरी : 332 विकेट्स

सोफी एक्लेस्टोन : 327 विकेट्स

दीप्ती शर्माच्या नावावर टी 20i क्रिकेटमध्ये किती विकेट्स?

तसेच दीप्तीने पाकिस्तान विरुद्ध 5 विकेट्स घेण्यासह आणखी मोठी कामगिरी केली. दीप्तीने टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्सचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. दीप्तीने याबाबतीत थायलँडच्या थिपाचा पुथावोंग हीचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.

तसेच दीप्ती पाकिस्तान विरुद्ध आणखी एक विक्रम केला. दीप्ती भारत-पाकिस्तान यांच्यातील टी 20i सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज ठरली. दीप्तीने पाकिस्तान विरुद्ध आतापर्यंत एकूण 11 विकेट्स मिळवल्या आहेत. याआधी हा विक्रम टीम इंडियाच्या एकता बिष्ट आणि पाकिस्तानच्या निदा डार हीच्या नावावर होता. या दोघींनी एकमेकांविरुद्ध प्रत्येकी 10-10 विकेट्स मिळवल्या होत्या. त्यामुळे आता दीप्ती पाकिस्ताननंतर नेदरलँड्स विरुद्ध आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us