Mohammad shami | अखेर बापच तो, मुलीबद्दल बोलताना मोहम्मद शमी खूपच भावूक, म्हणाला, हसीना जहाँ तिला….

Mohammad shami | मोहम्मद शमी सध्या त्याच्या दुखापतीवर उपचार घेत आहे. टीम इंडियात लवकर कमबॅक करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. या दरम्यान शमी पहिल्यांदाच त्याच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल व्यक्त झालाय. शमीने पोटच्या मुलीबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

Mohammad shami | अखेर बापच तो, मुलीबद्दल बोलताना मोहम्मद शमी खूपच भावूक, म्हणाला, हसीना जहाँ तिला....
Mohammad shami
| Edited By: | Updated on: Feb 12, 2024 | 7:05 PM

Mohammad shami | भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी सध्या क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. वर्ल्ड कपनंतर मोहम्मद शमीला दुखापत झाली. सध्या तो या दुखापतीवर उपचार घेत आहे. या दरम्यान मोहम्मद शमी आपल्या मनातील एक गोष्ट बोलून गेला. मोहम्मद शमी हे क्रिकेटबद्दल नाही, त्याच्या मुलीबद्दल बोलला. “मी बऱ्याच काळापासून माझ्या मुलीला भेटलेलो नाही, कारण पत्नी हसीना जहाँ मला भेटू देत नाही” असं शमी म्हणाला.

एका कार्यक्रमात मोहम्मद शमीला त्याची मुलगी आयराबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी तो भावूक झाला. “मी माझ्या मुलीला खूप मिस करतो. मी तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करतो. पण पत्नी हसीनाने अजूनपर्यंत मला तिला भेटू दिलेले नाही” असं शमी म्हणाला.

वाद पोलीस स्टेशन, कोर्टापर्यंत पोहोचला

मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीना जहाँ मागच्या 6 वर्षांपासून वेगळे राहतायत. 2018 साली हसीन जहाँने मोहम्मद शमीवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर ती शमीपासून वेगळी झाली. शमी आणि हसीनामधला हा वाद पोलीस स्टेशन, कोर्टापर्यंत पोहोचला. त्यानंतर हसीना शमीपाासून वेगळी झाली. शमीची मुलगी सध्या हसीना जहाँसोबत राहतेय.

खूप खराब आरोप केला

हसीना जहाँ अजूनही मोहम्मद शमीला टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाही. तिने अलीकडेच रोहित शर्माचा मुलीच्या मांडीवर डोक ठेवून झोपल्याचा फोटो शेअर करताना मोहम्मद शमीवर खूप खराब आरोप केला होता. सोशल मीडियावर याची बरीच चर्चा झाली होती.

त्यानंतर शमीने मागे वळून पाहिलं नाही

हसीना जहाँसोबत वाद सुरु असताना मोहम्मद शमी व्यक्तीगत आयुष्यात खूपच अडचणीत होता. त्या दरम्यान त्याला टीम इंडियातही स्थान मिळालं नव्हतं. पण मोहम्मद शमीने कमबॅक केलं. 2019 वर्ल्ड कपनंतर त्याने मागे वळून पाहिलेलं नाही. भारतात मागच्यावर्षी झालेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये मोहम्मद शमीने जबरदस्त प्रदर्शन केलं. त्याने 7 सामन्यात 24 विकेट घेतले होते.