क्रिकेट विश्वातून मोठी बातमी : टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूच्या पत्नीचे निधन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत खेळाडूने याबाबतची माहिती दिली.

क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा वर्ल्ड कप विनर आणि माजी खेळाडूवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. टीम इंडियाने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकलेल्या टीममधील खेळाडू कीर्ती आझाद यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कीर्ती आझाद यांनी त्यांची पत्नी पूनम आझाद यांच्या निधनाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. पूनम आझाद या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. लोकसभा निवडणुकीमध्ये त्या पती कीर्ती आझाद यांचा प्रचार करताना दिसल्या होत्या. व्हीलचेअरवर बसून त्या प्रचारामध्ये सहभागी झाल्या होत्या.
My wife, Poonam no more. Left for her heavenly aboard at 12:40 PM. Thank you all for your good wishes.
— Kirti Azad (@KirtiAzaad) September 2, 2024
पूनम आझादही बराच काळ राजकारणात होत्या, पण सुरुवातीला त्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यानंतर त्यांनी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवली. 2020 च्या निवडणुकीत काँग्रेसने त्यांना संगम विहार विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली, पण त्यांना विजय मिळाला नाही. 2016 मध्ये आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यापूर्वी त्या दिल्ली भाजपच्या प्रवक्त्या होत्या. मात्र, आम आदमी पार्टीमध्ये जास्त वेळ थांबल्या नाहीत. पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
आमचे खासदार आणि वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडू कीर्ती आझाद यांच्या पत्नी पूनम आझाद यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. पूनम यांला मी खूप दिवसांपासून ओळखत होतो. गेल्या काही वर्षांपासून त्या खूप आजारी होत्या. तिच्यावर उपचारही सुरू असल्याचे मला माहीत होते. कीर्ती आणि तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांना माझ्या संवेदना. देव पूनमच्या आत्म्याला शांती देवो, असं ट्विट करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी श्रद्धांजली वाहिली.
कीर्ती आझाद यांचे पूर्ण नाव कीर्तिवर्धन भागवत झा आझाद आहे. 1983 च्या विश्वचषक चॅम्पियन संघाचे भाग होते. टीम इंडियाकडून 7 कसोटी सामने आणि 25 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने टीम इंडियामध्ये अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावली होती. त्याच्या नावावर कसोटीत 3 आणि एकदिवसीय सामन्यात 7 विकेट आहेत.
