याला बोलतात दोस्ती! युवराज सिंहकडून निवृत्ती घेतलेल्या शिखर धवनला कडक ऑफर, नेमकी काय?

Yuvraj Singh New Offer To Shikhar Dhawan : टीम इंडियाचा खेळाडू शिखर धवन याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. शिखर याने मैदानाबाहेरूनच निवृत्ती घेतल्याने अनेकांनी निराशा व्यक्त केली. शिखरच्या निवृत्तीनंतर युवराज सिंग याने त्याला ऑफर दिली आहे.

याला बोलतात दोस्ती! युवराज सिंहकडून निवृत्ती घेतलेल्या शिखर धवनला कडक ऑफर, नेमकी काय?
| Updated on: Aug 25, 2024 | 4:06 PM

टीम इंडियाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच देशांतर्गत क्रिकेटलाही अलविदा केला आहे. आता धवन कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे. निवृत्तीनंतर माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने शिखर धवनला मोठी ऑफर दिली आहे. धवनच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया व्यक्त करत त्याने त्याला लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळण्याची ऑफर दिली आहे.

शिखर धवन याने शनिवारी 24 ऑगस्ट 2024 ला एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या निवृत्तीबाबत स्पष्टपणे सांगितलं. शिखर आयसीसीच्या टूर्नामेंटमध्ये दमदार कामगिरी करायचा, 2013 साली टीम इंडियाने जिंकलेल्या आयसीसी ट्रॉफीमध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. आयपीएलमध्येही शिखरची बॅट तळपताना दिसली. आता क्रिकेटच्या मैदानापासून दूर झाल्याने चाहत्यांनी त्याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.

युवराज सिंह याने केलेली पोस्ट:-

दमदार करियरसाठी जट्टजी अभिनंदन, तुझ्यासोबत ड्रेसिंग रूम शेयर करायला मिळाली याचा आनंद आहे. आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक संधीचा पुर्ण फायदा घेतला. मैदानावर आणि मैदानाबाहेरही नेहमी 100% पेक्षा जास्त योगदान दिलं आहे. आयसीसी टूर्नामेंटमध्ये तुझ्या निडर खेळीने आणि मॅचविनिंद प्रदर्शनामुळे तु खरा ‘गब्बर’ झालास. विरोधी संघही घाबरत होते. तुझ्या करियरमध्ये जे काही मिळवलं त्यावर तुला गर्व असायला पाहिजे. आता दुसरीकडे तुझे स्वागत आहे, लिजेंड क्रिकेट खेळायला ये, अशी पोस्ट युवराज सिंग याने केली आहे.

दरम्यान, शिखर धवन आणि युवराज सिंह दोघेही चांगले मित्र आहेत. दोघांनी टीम इंडियाकडून बरीच वर्षे क्रिकेट खेळले आहे. दोघांमध्ये चांगला बॉन्ड आहे. शिखर लिजेंड लीगमध्ये खेळणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. टीम इंडियाचा कॅप्टन असलेल्या युवराजने तर त्याला निवृत्ती घेतली त्या दिवशीच ऑफर दिली आहे.

Follow Us