
मुंबई | टीम इंडियाने श्रीलंका विरुद्ध 10 विकेट्सने ऐतिहासिक विजय मिळवत आशिया कपवर नाव कोरलं. या संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंनी निर्णायक भूमिका बजावली. त्यानंतर आता आयसीसीने वनडे रँकिंग जाहीर केली आहे. या आयसीसी वनडे रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या एका बॉलरला मोठा फायदा झाला आहे. टीम इंडियाच्या बॉलरने अव्वल स्थान काबीज केलंय. त्यामुळे आयसीसी वर्ल्ड कप 2023 आधी टीम इंडियासह त्या गोलंदाजाला मोठी गूड न्यूज मिळाली आहे. तसेच इतर संघांसाठी या बॉलरची कामगिरी ही धोक्याची घंटा आहे.
मोहम्मद सिराज आयसीसी वनडे बॉलिंग रँकिंगमध्ये नंबर 1 ठरलाय. सिराजने आशिया कप फायलमध्ये श्रीलंकेचं लंकादहन केलं. सिराजने या सामन्यात एका ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेतल्या. सिराजने त्या सामन्यात एकूण 6 विकेट्स घेतल्या होत्या. मोहम्मद सिराजच्या या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने श्रीलंकेला 50 धावांवर गुंडाळलं होतं. सिराजने त्या कामगिरीच्या जोरावर रँकिंगमध्ये थेट पहिल्या स्थानी पोहचला. सिराजची अव्वल स्थानी पोहचण्याची ही दुसरी वेळ ठरलीय. सिरज याआधी मार्च 2023 मध्येही नंबर 1 झाला होता.
सिराजने रँकिंगमध्ये लाँग जंप घेतली. सिराज आठ स्थानाची झेप घेत पहिल्या स्थानी पोहचला. सिराजने एका झटक्यात दिग्गज गोलंदाजांना मागे टाकत धोबीपछाड दिली. सिराजने ट्रेन्ट बोल्ट, राशिद खान, जोश हेझलवूड, मिचेल मार्श यांना मागे टाकत ही गगनभरारी घेतली.
मॅजिक मिया नंबर 1
Top of the world 🔝
India’s ace pacer reigns supreme atop the @MRFWorldwide ICC Men’s ODI Bowler Rankings 😲
— ICC (@ICC) September 20, 2023
मोहम्मद सिराज याने आशिया कप 2023 मध्ये एकूण 10 विकेट्स घेतल्या. त्यापैकी 6 विकेट्स या आशिया कप फायनलमध्ये घेतल्या. सिराजने एकहाती अंतिम सामना फिरवला. सिराजने फक्त ओव्हर्स बॉलिंग केली. त्यातही 1 ओव्हर मेडल. सिराजने या स्पेलमध्ये फक्त 21 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. सिराजने या दरम्यान एका ओव्हरमध्ये पाथुम निसांका, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डीसिल्वा, दासून शनाका आणि कुसल मेंडीस यांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
दरम्यान टीम इंडिया आता वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरिज खेळणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे. या मालिकेला 22 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.