Team India: पृथ्वी शॉ ने सिलेक्टर्सवर साधला निशाणा, पहिल्यांदा आपल्या वक्तव्याने निर्माण केलं वादळ

| Updated on: Jan 12, 2023 | 12:19 PM

23 वर्षाच्या पृथ्वीला जवळपास 2 वर्षांपासून सिलेक्टर्सनी टीम इंडियात स्थान दिलेलं नाही. आता या क्रिकेटरने आपल्या विधानाने वादळ आणलय.

Team India: पृथ्वी शॉ ने सिलेक्टर्सवर साधला निशाणा, पहिल्यांदा आपल्या वक्तव्याने निर्माण केलं वादळ
Prithvi shaw
Follow us on

Team India: भारताचा युवा खेळाडू पृथ्वी शॉ ने आपलं मौन सोडून पहिल्यांदा सिलेक्टर्सवर निशाणा साधलाय. पृथ्वी शॉ ने आपल्या विधानाने वादळ निर्माण केलय. 23 वर्षाच्या पृथ्वीला सिलेक्टर्सनी जवळपास 2 वर्षांपासून टीम इंडियात निवडलेलं नाही. पृथ्वी टीम इंडियाकडून शेवटचा 2021 साली श्रीलंकेविरुद्ध सीरीजमध्ये खेळला होता. श्रीलंका दौऱ्यासाठी त्याची टीम इंडियात निवड झाली होती. पृथ्वी शॉ च्या भात्यात एकापेक्षा एक सरस फटके आहेत.

परफॉर्मन्सनधून सडेतोड उत्तर

सिलेक्टर्सनी पृथ्वी शॉ ला प्रत्येक सीरीज आणि मल्टीनेशन टुर्नामेंटच्यावेळी इग्नोर केलय. पृथ्वीने त्याच्यावर होणाऱ्या या अन्यायावर तोंड चालवल नाही. बॅटने कमाल करुन दाखवली. मुंबईच्या या टॅलेंटेड प्लेयरने आसाम विरुद्ध रणजी सामन्यात 379 धावांची ऐतिहासिक खेळी केली. सिलेक्टर्सना त्याने आपल्या परफॉर्मन्सनधून सडेतोड उत्तर दिलं. आता पृथ्वीने सिलेक्टर्सवर निशाणा साधलाय.

पृथ्वीने सांगितलं त्याचं टार्गेट

“कोणी मला भारतीय टीममध्ये बोलवणार की, नाही हा विचार मी करत नाही. फार पुढचा विचार न करता, मी फक्त गोष्टी योग्य करण्याचा प्रयत्न करतोय. मी मुंबईसाठी खेळतोय. रणजी ट्रॉफी जिंकणं हे माझं लक्ष्य आहे” असं पृथ्वी शॉ म्हणाला.

काहीवेळा तुम्ही निराशा होता

“काहीवेळा तुम्ही निराशा होता. तुम्ही गोष्टी योग्य करताय, हे तुम्हाला ठाऊक असतं. तुम्ही प्रामाणिक आहात. मैदानाच्या आत आणि बाहेर शिस्त पाळताय. पण, तरीही जे लोक तुम्हाला ओळखत नाहीत, ते तुमच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलतात” असं पृथ्वी म्हणाला.

पृथ्वीने काय म्हटलय?

सातत्याने सिलेक्शन कमिटीकडून दुर्लक्ष होत असल्याने त्याने काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. ‘साईबाबा तुम्ही सगळं पाहताय’ अशा आशयाची ती पोस्ट केली. यश माणसाला समजदार बनवतं, तर कठीण काळ तुम्हाला लवकर परिपक्व बनवतो. “माझ्या वाईट काळात जे लोक माझ्यासोबत नव्हते, त्यांची मी पर्वा करत नाही. फक्त मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. हीच सर्वात चांगली निती आहे” असं पृथ्वीने म्हटलं होतं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दररोज 400 धावा बनत नाहीत. रियान परागच्या चेंडूवर तो LBW आऊट झाला नसता, तर तो 400 ची धावसंख्या पार करु शकत होता.