Jasprit bumrah: जसप्रीत बुमराहला घडवणारे कोचच म्हणतात, त्याला कॅप्टन बनवू नका, कारण….

| Updated on: Jan 30, 2022 | 11:59 AM

बुमराह, (jasprit bumrah) उपकर्णधार केएल राहुलने कसोटी संघाच्या कर्णधारपदाची इच्छा लपवून ठेवलेली नाही. आपल्याला ही संधी मिळाली, तर तो सन्मानच असेल, असं दोघांनी म्हटलं आहे.

Jasprit bumrah: जसप्रीत बुमराहला घडवणारे कोचच म्हणतात, त्याला कॅप्टन बनवू नका, कारण....
Jasprit bumrah (IPL/Twitter)
Follow us on

नवी दिल्ली: दोन आठवड्यांपूर्वी विराट कोहलीने (Virat kohli) तडकाफडकी कसोटी संघाचे कर्णधारपद सोडलं. विराट कोहली अचानक त्या पदावरुन पायउतार झाल्यापासून कसोटी संघाच्या कर्णधारपदी (India test captain) कोणाची वर्णी लागणार? याबद्दल बरेच तर्क-वितर्क लढवले जात आहेत. टेस्ट टीमच्या कॅप्टनशिपसाठी रोहित शर्मापासून जसप्रीत बुमराहपर्यंत वेगवेगळी नाव चर्चेत आहेत. बुमराह, (jasprit bumrah) उपकर्णधार केएल राहुलने कसोटी संघाच्या कर्णधारपदाची इच्छा लपवून ठेवलेली नाही. आपल्याला ही संधी मिळाली, तर तो सन्मानच असेल, असं दोघांनी म्हटलं आहे. त्यामुळे टेस्ट टीमच्या कॅप्टनशिपची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याबद्दल बरीच उत्सुक्ता आहे. वनडे आणि टी-20 चा नियमित कर्णधार रोहित शर्माचं नाव सध्या आघाडीवर आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित दक्षिण आफ्रिकेतील कसोटी आणि वनडे सीरीजला मुकला होता. आता वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत त्याच्याकडे नेतृत्व क्षमता सिद्ध करण्याची संधी आहे.

बुमराह कर्णधारासारखा विचार करतो

रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुलने कर्णधारपदाची जबाबदारी संभाळली. भारताच्या वेगवान गोलंदाजीचं नेतृत्व करणारा जसप्रीत बुमराहचं नावही टेस्ट टीमच्या कॅप्टनशिपसाठी घेतलं जातय. यावर भारताचे माजी बॉलिंग कोच भरत अरुण यांनी आपल मत व्यक्त केलं आहे. जसप्रीत बुमराह कर्णधारासारखा विचार करतो. त्याच्याकडे ती क्षमता आहे. पण त्याला कर्णधारपद मिळणं अवघड आहे. कर्णधारपद मिळाल्यानंतर बुमराहला तिन्ही फॉर्मेटसाठी उपलब्ध रहावे लागेल, ते त्याला शक्य आहे का? असा प्रश्न भरत अरुण यांनी उपस्थित केला. बुमराह एक वेगवान गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाजांना विश्रांती द्यावी लागते, त्यामुळे भरत अरुण यांनी हा मुद्दा उपस्थित केला. बुमराहला सीरीज दरम्यान ब्रेक आवश्यक आहे, तरच तो फिट राहू शकतो याकडे भरत अरुण यांनी लक्ष वेधलं.

‘या’ तिघांमध्ये कर्णधारपद भूषवण्याची क्षमता 

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वनडे मालिकेसाठी जसप्रीत बुमराह भारताचा उपकर्णधार होता. जोहान्सबर्गच्या दुसऱ्या कसोटीत विराट कोहली खेळला नाही, त्याच्याजागी राहुलला कर्णधार तर बुमराहला उपकर्णधार बनवण्यात आलं होतं. टीम इंडियाचे माजी बॉलिंग कोच भरत अरुण यांच्या मते केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतमध्ये कर्णधारपद भूषवण्याची क्षमता आहे. फलंदाजाला कर्णधार बनवलं जाऊ शकतं, कारण तो विना ब्रेक सतत मालिका खेळू शकतो. आज भारताकडे वेगवान गोलंदाजांचा जो ताफा उपलब्ध आहे, त्याचे श्रेय भरत अरुण यांना जाते. त्यांनी रोटेशन पॉलिसीनुसार तितक्याच ताकतीचे पर्यायी गोलंदाज तयार केले. आज जसप्रीत बुमराहच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

team india test captain bharat arun on jasprit bumrah captaincy chances rohit sharma