IND vs SL: कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडिया इतिहास रचणार, दोन विजय हा मोठा विक्रम मोडणार

IND vs SL Test Series: भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. असं असताना या मालिकेत भारताची नजर एका मोठ्या विक्रमावर असणार आहे. यासाठी भारताला दोन्ही सामने जिंकणं भाग आहे.

| Updated on: Aug 10, 2026 | 6:30 PM
1 / 5
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमध्ये मोठा इतिहास रचण्याची संधी आहे. भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारताला दोन्ही सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
भारतीय संघाने 1932 पासून आतापर्यंत 299 कसोटी सामने खेळले असून 186 सामन्यात विजय मिळवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. पण या विजयानंतर क्रमवारीत सुधारणा होऊ शकते. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
भारताने कसोटी मालिकेत श्रीलंकेला क्लिन स्वीप दिला तर कसोटी विजयांची संघ्या 188 होईल. यासह भारतीय संघ वेस्ट इंडिजला मागे टाकून चौथं स्थान गाठेलं. वेस्ट इंडिजने 187 कसोटी सामने जिंकले आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ पुढे आहेत. ऑस्ट्रेलियाने 426 कसोटी सामने जिंकले असून अव्वल स्थान गाठलं आहे. तर इंग्लंड 405 कसोटी विजयासह दुसऱ्या आणि दक्षिण अफ्रिका 191 कसोटी विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
भारतीय संघ पहिला कसोटी सामना खेळताच कसोटी क्रिकेटमध्ये 600 सामने खेळणारा संघ ठरेल. शुबमन गिलच्या नेतृत्वात खेळला जाणारा गॉल कसोटी सामना ऐतिहासिक असणार आहे. (PHOTO CREDIT- PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us